Home | Maharashtra | Vidarva | Akola | Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur

माहुर गडावरील दत्त शिखर संस्थानच्या गोदामास भीषण आग, 10 लाखांचे साहित्य जळून खाक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 07:37 PM IST

माहुर गडावरील दत्त शिखर संस्थानच्या गोदामास भीषण आग लागून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 • Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur

  यवतमाळ- माहुर गडावरील दत्त शिखर संस्थानच्या गोदामास भीषण आग लागून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे पर्यंत करून आ आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही प्राण हाणी नाही.

  मिळालेली माहिती अशी की, माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गोदामास (घोडे पागी) शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात पातळ, खण, नारळ, प्रसाद व फर्निचर जळून खाक झाल्याने सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  दत्त शिखर संस्थानच्या गोदामास लागलेली आग विझविण्यासाठी कर्मचा-यांनी प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप घेतल्याने माहूर नगर पंचयतला माहीती देण्यात आली. मुख्याधिकारी विद्या कदम, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी अग्निशमन गाड़ी व दलासह शिखर गाठले. आग विझवण्यासाठी उमरखेड, पूसद व किनवट येथील अग्निशमनदलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. तहसीलदार विक्रम राजपूत, उप विभागीय पुलिस अधिकारी असाराम जहारवाल, पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, योगी शामभारती महाराज, नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नगरसेवक इलियास बावाणी,नगर पंचायतीचे स्वछतादूत गणेश जाधव, आनंद पाटील तुपदाळे ,वासुदेव भारती महाराज, संजय सुरोशे, पुरषोतम लांडगे, गोपाल भारती,शिखर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव माने, गोपाल भारती, नायब तहसीलदार कागने,मेघराज जाधव,यांचेसह तेथील व्यापारी व अनेक दत्त भक्तांनी संस्थान डे धाव घेतली.

  महागाव व माहूर येथील रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. माहूरचे मंडल अधिकारी येरावार यांनी घटनेचा पंचनामा केला.या आगीत कुठलीही प्राण हाणी झाली नाही.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. दत्त शिखर संस्थानच्या गोदामास लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटो...

 • Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur
 • Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur
 • Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur
 • Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur
 • Major Fire in Shri Datta Shikhar Santhan Mahur

Trending