आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे दागिने-कपडे शेजार्‍याला दाखवणे पडले महागात..महिलेने असा रचला नवविवाहितेच्या हत्येचा कट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- पाच महिन्यांपूर्वी नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहाणार्‍या दामप्त्याला अटक केली आहे. नवविवाहित माला ‍हिला लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे पाहून आरोपी दाम्पत्याला लालसा सुटली होती. विशेष म्हणजे आरोपी माला हिचा आतेभाऊ आणि वहिणी आहे.

 

हत्येच्या एक दिवस आधी मालाने आरोपी महिलेला सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे दाखवले होते. महिलेने याबाबत तिच्या पतीला माहिती दिली होती. मालाचा पती ऑफिसला गेल्यानंतर आरोपी दाम्पत्याने कट रचून तिला घरी बोलवले आणि तिचा गळा आवळून खून केला होता. नंतर मालाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

 

मालाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून दिला...
आरोपी दाम्पत्याने मालाची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. आरोपी महिलेने मालाचे सोन्याचे दागिने, महागडे कपडे आणि मोबाइल फोन बॅगमध्ये भरून माहेरी निघून गेली होती. नंतर रात्री 9 वाजता आरोपीने एक ऑटो बोलवून मालाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून इंदिरापुरम परिसरात फेकून दिला होता.

 

नातेवाईकांनी मालाच्या पतीवर केले होते गंभीर आरोप...
- एसएसपी डॉ. अजयपाल यांनी सांगितले की, सौरभ दिवाकर आणि रितू दिवाकर असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. आरोपींकडून मृत मालाचे सोन्याचे दागिने, कपडे आणि मोबाइल जप्त करण्‍यात आला आहे.

दोन्ही आरोपींना बिसरख पोलिसांनी हैबतपूरजवळ मगळवारी अटक केली. आरोपीनी 7 एप्रिल रोजी सायंकाळी मालाची हत्या केली होती. मालाचा पती शिवम नोएडा येथील डीएलएफ मॉलमधील एका शोरूममध्ये नोकरीवर गेला होता.

- रात्री जवळपास 9:30 वाजता शिवमने पत्नी माला हिला फोन केला असता तिचा फोन बंद येत होता. रात्री 11 वाजता तो घरी आला तेव्हा माला घरी नव्हती. तसेच तिचा सामानही गायब होता. 10 एप्रिलला सकाळी इंदिरापुरम भागात मालाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला होता. मालाच्या नातेवाइकांनी बिसरख पोलिस ठाण्यात शिवमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिवमने हुंड्यासाठी मालाची हत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता.

 

घर सोडल्याने शेजारच्या दाम्पत्यावर आला संशय..
एसएसपी डॉ. अजयपाल यांनी सांगितले की मालाच्या नातेवाईकांनी शिवमच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शिवमला संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. मालाची हत्या झाली तेव्हा तो डीएलएफ मॉलमधील एका शोरुममध्ये कामावर होता, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शिवमला सोडून दिले हते. मात्र, या घटनेनंतर  शेजारी राहाणारे सौरभ आणि रितूने घर ‍रिकामे केले होते. पोलिसांना दोघांवर संशय आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशी पोलिसी खाक्या पाहाताच दोघांनी गुन्हा कबूल केला.

बातम्या आणखी आहेत...