आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी आयुष्य जगत होते हे आजोबा..एके दिवशी सापडले पत्नीचे पत्र आणि 50 वर्षांपूर्वीचे राज आले समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशीगन- अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी एक अनोखी घटना घडली. ती म्हणजे, एका 81 वर्षीय व्यक्तीला त्याच्या पत्नीचे 50 वर्षांपूर्वीचे एक पत्र सापडले. पत्रातून एक राज समोर आले. पत्रात लिहिले होते की त्यांना एक मुलगा आहे. हे वाचून व्यक्तीला खूप आनंद झाला. तो पहिल्यांदा मुलाला भेटला आणि निपुत्रिक  असल्याचे दु:ख पूर्णपणे विसरुन गेला. मात्र, त्याने त्यानंतर स्वत:ची पॅटर्निटी टेस्ट केली तर रिपोर्ट निगेटिव्ह आला. रिपोर्ट पाहून व्यक्तीला प्रचंड धक्का बसला. तरीही दोघांनी पिता-पुत्राचे नाते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

पत्रातून समोर आले 50 वर्षांपूर्वीचे राज!

- मिशीगनमध्ये राहाणारे टोनी त्रपनी (81) एके दिवशी कॅबिनेटची साफसफाई करत होते. तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीचे एक पत्र सापडले. त्यात 50 वर्षांपूर्वीचे एक राज दडले होते.  
- टोनीच्या पत्नीने लिहिले होते की, त्यांना एक मुलगा आहे.   
- पत्राचा आधार घेत टोनीने पेन्सिलव्हेनिया येथे राहात असलेल्या मुलाचा शोध घेतला. पहिल्यांदा मुलगा सॅम्युअलची भेट घेतली. तो 61 वर्षांचा झाला होता
- पत्नीने हे राज एवढे वर्ष लपवून का ठेवले. मुलाला भेटून मला प्रचंड आनंद झाला आहे.

 

एका क्षणात आनंदावर फिरले पाणी...
- टोनी आणि सॅम्युअलने पिता-पुत्राचे नाते कायम ठेवत एकमेकांसोबत वेळ घालविण्यास सुरुवात केली. नंतर दोघांनी पॅटर्निटी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.
- एक महिन्यानंतर दोघांनी पॅटर्निटी टेस्ट केली. मात्र, हाती पडलेल्या रिपोर्टने एका क्षणात आनंदावर पाणी फिरले. रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, तरीही टोनी आणि सॅम्युअलने पित्रा-पुत्राचे नाते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...