RSS चा गणवेश / RSS चा गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने मदरशातील 6 मुलांना घेतले दत्तक, 4 वेळा केली आहे हज यात्रा

Nov 06,2018 02:42:00 PM IST

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देशातील मदरशांकडे संशयाच्या नजरेने पाहात असेल. परंतु हाजी हैदर आझम हे RSSचा गणवेश परिधान करून हातात काठी घेऊन संघाच्या दसरा रॅली सहभागी झाले होते. हैदर यांनी मालाडमधील एका मदरशातील 6 मुलांना दत्तक घेतले आहे. एवढेच नाही तर त्यांनी मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी स्विकारली आहे.

कोण आहेत हाजी हैदर?

- हाजी हैदर यांनी 4 वेळा हज यात्रा केली आहे.
- हाजी हैदर हे भाजपचे सिटी व्हाइस प्रेसिडेंट आणि मौलाना आझाद मायनॉरिटीज फायनांशियल डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे चेअरमन आहेत.
- मालाडमधील नूर मेहर चॅरिटेबल ट्रस्टच्या जामिया तजविदुल कुराण आणि नूर मेहर स्कूलच्या एका कार्यक्रमात 6 मुलांना दत्तक घेतल्याची घोषणा केली.
- हैदर यांनी सांगितले की, दत्तक घेतलेली सर्व मुले हाफिज असून ते SSC परीक्षा उत्तीर्ण आहेत.
- कुराण परिपूर्ण माहित असलेल्यांना हाफिज असे संबोधले जाते.

मी RSS मध्ये सहभागी झालो नाही..- हैदर

- एका मीडिया रिपोर्टनुसार, हैदर यांनी RSS च्या गणवेशातील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हैदर यांनी सांगितले की, दसरा मेळाव्याला RSS ने त्यांना निमंत्रित केले होते.

- त्यांनी मला संघाचा गणवेश पाठवला होता. तो गणवेश परिधान करून मी मेळाव्याला गेलो होतो, परंतु मी RSS मध्ये सहभागी झालो नसल्याचे हैदर यांनी स्पष्‍ट केले आहे.

X