आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूची प्रतिक्षा करत होता एक व्यक्ती..भायखळा रेल्वे स्टेशनवर लोकल येताच स्वत:ला दिले झोकून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भायखळा रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीने लोकल गाडीसमोर उडी घेऊन स्वत:चे आयुष्य संपविले. ही घटना स्टेशनवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

अशी घडली घटना.. 

ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांला घडली. लोकल गाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव भारत मनोहरलाल जैन (47) असे आहे. तो कमाठीपुरा भागात राहत होता.

 

भारत हा भायखळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभा होता. तो लोकल गाडीची प्रतिक्षा करत असल्याचे व्हिडिओत दिसते. गाडी जशी प्लॅटफार्मवर येते तितक्यात हा भारत उडी घेतो. गाडी खाली कापला जावून त्याचा जागेवरच मृत्यू होतो. भारतचा मृतदेह रेल्वे गाडीच्या चाकात अडकला होता.

 

रेल्वे सेवेवर परिणाम...

मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा फास्ट डाऊन रेल्वे मार्गावरील सेवेवर परिणाम झाला होता. रेल्वे गाडीचा वेग जास्त असल्याने व्यक्तीच मृतदेह गाडीच्या चाकामध्ये अडकला होता. त्याला काढण्यासाठी 50 मिनिटांचा कालावधी लागला. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांला आलेली गाडी 11 वाजेपर्यंत प्लॉटफॉर्मवरच उभी होती. इतर गाड्या डाऊन स्लो मार्गावर डायव्हर्ट करण्‍यात आल्या होत्या.

 

बातम्या आणखी आहेत...