आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी तरुणाचे अपहरण केले, नंतर विवस्र करून केली बेदम मारहाण; घटना कॅमेर्‍यात कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शहरातील जोगेश्वरी परिसरातील एका तरुणाचे कारमधून अपहरण करून त्याला विवस्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.

 

आधी अपहरण नंतर विवस्र करून बेदम मारहाण...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना 22 नोव्हेंबरला घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाला काही लोक बेदम मारहाण करताना दिसत आहेत. आसिफ अल्ताफ शेख असे पीडित तरुणाचे नाव आहे.

 

आसिफ हा जोगेश्वरी परिसरात राहातो. तो हिस्ट्रीशीटर असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आसिफचे काही लोकांनी अपहरण करून वांद्रे येथील कला नगर भागात नेले. तिथे त्याला विवस्र करून बेदम मारहाण करण्यात आली.

 

या प्रकरणी धारावी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. परेश, मोहित, अजय आणि प्रकाश अशी आरोपींची नावे आहेत. आसिफ शेख यांच्यावर सायन हॉस्पिटल उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...