आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय..पोटच्या 2 मुलांना विहिरीत ढकलून केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दारुड्या पतीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. नागपुरातील एमआयडीसी परिसरात गुरुवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली.

 

दारूच्या नशेत मुलांना ठार करणाऱ्या नराधमाचे नाव संतोष मेश्राम (वय- 32) असे आहे. गुरुवारी सायंकाळी संतोषने दारूच्या नशेत पत्नीशी वाद घातला. त्यानंतर त्याने आपल्या हर्षकुमार (वय 6 ) आणि प्रिन्सकुमार (4 वर्ष) या दोघा मुलांना विहिरीत ढकलून दिले. दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी संतोषला अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...