आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री झोपायला जाताच त्याला यायचा ड्रम वाजवल्याचा आवाज, कान तपासल्यानंतर डॉक्टरही झाले थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही स्टोरी 'मेडिकल सायन्स' सीरीजवर आधारित आहे. जगभरात मेडिकल सायन्सशी निगडीत अशा अनेक रिअल लाइफ शॉकिंग स्टोरीज समोर येतात.)

 

चीन- 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कानाच्या एका डॉक्टरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. वृद्ध व्यक्ती मागील काही महिन्यांपासून एका अनोख्या समस्येने त्रस्त होता. वय झाल्यामुळे त्याला हा त्रास होत असावा, म्हणून त्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, एके दिवशी त्रास जास्त वाढल्याने त्याने हॉस्पिटमध्ये धाव घेतली. जेव्हा डॉक्टरांनी व्यक्तीचा कान तपासला तेव्हा तर ते थक्कच झाले. कानात एक मोठा कोळी जाळे बनवून आरामात राहात होता.

 

रात्री कानाची वेदना असाह्य झाल्याने व्यक्ती डॉक्टरांकडे पोहोचला. त्याने डॉक्टरांना सांगितले की, त्याच्या कानात असाह्य वेदना होत आहे. कोणी आपल्याजवळ ड्रम वाजवत असल्याचा आवाज येत असल्याचे तो म्हणाला. तसेच कानात प्रचंड वेदना होत आहे.

 

कानात जाळे विणून राहात होता कोळी...
- नाक- कान- घसा विशेषज्ज्ञ कुई शूलिन यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीची एंडोस्कोपी केल्यानंतर मी थक्क झालो. व्यक्तीच्या कानात एक मोठा कोळी होता. तो जाळे ‍विणून त्यात राहात होता. कोळी लहान असेल तेव्हापासून तो कानात होता.

 

सुदैवाने बचावला कानाचा पडदा...
- डॉक्टरांनी सांगितले की, कानात स्प्रे करून कोळीला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोळीने व्यक्तीच्या कानाच्या पडद्या कोणतीही इजा पोहोचवली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...