आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सकल मराठा क्रांती मोर्चांचे बेमुदत उपोषण मागे; बहुतांश मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा अारक्षणाची मागणी मार्गी लागत अाहे. अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक अाहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ दिवसांत निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याच्या कामास गती देण्यात येईल, असे अाश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर अाझाद मैदानात गेल्या १६ दिवसांपासून अामरण उपाेषणास बसलेल्या सकल मराठा क्रांती महामाेर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी अांदाेलन मागे घेत असल्याची घाेषणा केली. मराठा समाजाची दिशाभूल न करता सरकारच्या वतीने आता १० दिवसांत मागण्यांची पूर्तता व्हावी, अन्यथा पुन्हा अांदाेलनाचा उद्रेक होईल, असा इशारा माेर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील यांनी या वेळी दिला. 

 

महाजन यांनी घेतली भेट
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी संध्याकाळी उपाेषणस्थळी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. अांदाेलन मागे घेण्याचे अावाहन केले. मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि मराठा अारक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून नऊपैकी पाच ते सात मागण्यांची पूर्तता करण्यात येत अाहे. मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात २४ अाॅक्टाेबरला शासनादेश काढण्यात आला अाहे. त्यामुळे बहुतांश मागण्या मार्गी लागल्या अाहेत. त्यांची पूर्तता करण्यात तांत्रिक अडचणी येत असतील तर त्या दूर करून गती देण्यात येर्इल, अशी हमी महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आंदोलनकर्त्यांना दिली. या अाश्वासनानंतर अामरण उपाेषण मागे घेत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अाणि भाजपचे अामदार प्रसाद लाड यांच्याकडून माेसंबीचा रस पिऊन अांदाेलकांनी उपाेषण साेडले. 

 

अधिवेशनाच्या काळातच मागण्या मान्य करा 
सकल मराठा क्रांती महामाेर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अाश्वासनावर विश्वास ठेवून अाम्ही उपाेषण मागे घेत अाहाेत, असे सांगितले. या मागण्या अधिवेशनाच्या १० दिवसांच्या काळात मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा अाझाद मैदानातच पाणी न पिता अामरण उपाेषण पुन्हा सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला. 

 

आरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील 
करमाड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार १ डिसेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा सरकार करणार आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत असेल आणि आरक्षणाच्या टक्केवारीची मर्यादा ओलांडली तरी ते टिकवण्यासाठी सरकार वकिलांची फौज उभी करेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सावंगी (ता. औरंगाबाद) येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली. 

 

मराठा क्रांती ठोक माेर्चा आक्रमक, २० नोव्हेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषण 
औरंगाबाद । '१ डिसेंबरला जल्लोष करा' या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसल्याचे जाहीर करून मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. याची पूर्वतयारी म्हणून १८ नोव्हेंबर रोजी लासूर स्टेशन येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष सभा आयोजित केली आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षण, कोपर्डीच्या प्रकरणातील आरोपींना फाशी, आंदोलनादरम्यानचे गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्याही त्यांनी केल्या. 

 

अारक्षण भीक नाही, प्रतिनिधित्व : हार्दिक पटेल 
जालना | मराठा समाजाला सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची गरज आहे. यातून येणाऱ्या पिढीला चांगले शिक्षण,रोजगार देता येईल. त्यामुळे आरक्षण हे भीक नाही तर उपेक्षित समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. हे लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, असे अावाहन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे आयोजित मराठा आरक्षण व दुष्काळ परिषदेत बोलताना केले. 

 

मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणू : विखे पाटील 

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? या अहवालातील शिफारशींची अधिकृत माहिती नसताना त्या अाधारावर मुख्यमंत्री घाेषणा कसे करू शकतात? आयोगाचे सदस्य माध्यमांसमोर भाष्य करतात कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित करून विधानसभेतील विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या विराेधात हक्कभंग प्रस्ताव अाणण्याचा इशारा शनिवारी दिला. 

बातम्या आणखी आहेत...