आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासंदर्भात 29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात विधेयक मांडणार- मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठा आरक्षण विधेयक  कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी तयार असून ते 29 नोव्हेंबरला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

सरकार मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर एटीआर म्हणजे अॅक्शन टेकन रिपोर्ट मांडणार आहे. आयोगाने दिलेल्या तीन शिफारशी स्वीकारुन सरकार आरक्षण विधेयक विधिमंडळात मांडणार आहे. सरकार आरक्षणाबाबत गंभीर असून विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

 

मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर तो तातडीने सभागृहात मांडा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून यावरुन विरोधकांचा गदारोळ सुरु आहे.

 

दुसरीकडे, आरक्षणासंदर्भात गटनेत्यांच्या आज दुपारी 3 वाजता होणारी बैठक रद्द झाली आहे. आता ही बैठक मंगळवारी सकाळी 10 वाजता होणार आहे.

 

कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत

दरम्यान, मुंबईत सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी मोर्चाची आहे. मात्र मंत्रालय परिसरात धडकलेल्या काही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत होते. त्यांना पोलिसांनी रोखले.

 

पुणे, नाशकात कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात...

राज्यरातून निघालेली 'संवाद यात्रा' साेमवारी मुंबईत धडकणार त्याआधीच मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. पुणे, नाशिक सह राज्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

मराठा आरक्षण व आंदोलनातील गुन्हे मागे घेऊन पोलिसांकडून होणारी दडपशाही थांबवावी, कर्जमुक्ती, हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवून त्यात सुधारणा करावी आदी मागण्यांबाबत जनजागृती करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात 16 नोव्हेंबरपासून संवाद यात्रा सुरू केली होती. ती सोमवारी मुंबईत धडकली.

 

सर्वांचाच मराठा आरक्षणाला पाठिंबा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबत सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांची मते विचारात घेण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वच जातीमधील लोकांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे.

 

- मराठा समाजातील 98.30 टक्के लोक म्हणतात की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे.

- 89.56  टक्के कुणबी म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळावे.

- 90.83 टक्के ओबीसी म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळावे.

- 89.39 टक्के इतर जातीय म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळावे

बातम्या आणखी आहेत...