आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maratha Reservation: वाचा, मराठा समाजाची सद्य:स्थिती आणि काय आहेत कृती अहवालातील मुद्दे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्‍यात आले आहे. सत्ताधारी भाजपमध्ये जल्लोष सुरु आहे. विधिमंडळात भाजप सदस्यांनी फेटे बांधून वातावरण निर्मिती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केले.

 

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार असून ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

मराठा समाजाची सद्य:स्थिती
- मराठा समाजातील व्यक्तींपैकी 13.42 टक्के निरक्षर.
- 35.31 टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले.
- 43.79 टक्के 10 वी 12 वी शिक्षण घेतलेले.
- 6.71 टक्केच पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले.
- तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण 0.71 टक्के.
- 93 टक्के मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखांच्यापेक्षा कमी.
- मराठा समाजाची बीपीएल टक्केवारी 24.2 टक्के.
- 71 टक्के मराठा शेतकरी अल्पभूधारक.

 

काय आहेत कृती अहवालातील मुद्दे....
- राज्यात सध्या लागू असलेल्या विद्यमान 52 टक्के आरक्षणास धक्का न लावता, त्यात वाढ करण्यासाठी, जे उन्नत व प्रगत गटातील नाहीत केवळ अशा व्यक्तींनाच 50 टक्क्यांची कमाल मर्यादा वाढवून आरक्षणाच्या टक्केवारीसाठी तरतूद.
- मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद
- अल्पसंख्यांक वर्गाच्या शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था, खासगी शैक्षणिक संस्था, अनुदानप्राप्त, विनाअनुदानित संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद.
- ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, महानगरपालिका आदी निवणुकींसाठी जागांच्या आरक्षणासाठी तरतूद नाही.
- लोकसेवा, सरळसेवा नियुक्त्यांमध्ये आरक्षण.

 

बातम्या आणखी आहेत...