आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट भागातील झोपडपट्टीमध्ये बुधवारी आधी शॉर्टसर्किट आणि त्यानंतर त्यामुळे सिलिंडरचा भडका उडून लागलेल्या भीषण आगीत सुमारे ८० झोपड्या जळून खाक झाल्या. तर, २०० पेक्षा जास्त झोपड्यांमधील लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने यात काेणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, २ महिलांसह ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू अाहे.
पाटील इस्टेट भागातील गल्ली क्रमांक तीनमधील एका घरात दुपारी १ वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे अाग लागली. याची अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. परंतु, दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आसपासच्या गल्लीतील एकमेकांना लागून असलेल्या झाेपड्यांत आग वेगाने पसरली. पत्र्यांचे शेड असल्यामुळे अागीची तीव्रता वाढून घरातील सामानाने पेट घेतला. त्यातच सुमारे ७ ते ८ स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने तीव्रता अधिकच वाढली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
परंतु, अरुंद गल्लीबाेळांमुळे त्यांना बंब अथवा पाण्याचा पाइप घेऊन गल्लीत शिरणे अवघड झाले. त्यातच प्रत्येक जण त्यांच्या घरातील सिलिंडर, फ्रिज, टीव्ही, कपडे इत्यादी वस्तू अरुंद गल्लीतून घेऊन पळू लागल्याने जवानांना अागीच्या ठिकाणी पाेहोचण्यास वेळ लागला. अखेर त्यांनी घरांच्या पत्र्यांवर चढून अाग अाटाेक्यात अाणण्याचा प्रयत्न केला. तीव्रता पाहून छावणी, पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील अन्य सुमारे ३० ते ३५ गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे १०० जवानांनी तब्बल दाेन ते अडीच तास अथक प्रयत्न करत ३.४५ वाजेच्या सुमारास अाग अाटाेक्यात अाणली. त्यानंतर विविध घरांतील अाग कुलिंगचे काम अग्निशामक दलाचे जवान व स्थानिक नागरिक करत हाेते.
दाेन दिवसांपूर्वीही लागली हाेती याच भागात अाग
दोनच दिवसांपूर्वी म्हणजे साेमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट येथील गल्ली क्रमांक पाचमधील एका झाेपडपट्टीला अाग लागली हाेती. त्या वेळी ही अरुंद गल्लीबाेळांमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना गल्लीत जाणे मुश्कील झाले हाेते. बुधवारी माेठ्या प्रमाणात अाग लागल्याने बघ्यांची गर्दी घटनास्थळी जमल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. या घटनेमुळे पुण्याकडून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काेंडी हाेऊन वाहनांच्या रांगा लागल्या.
स्थानिकांनी सिलिंडर बाहेर काढल्याने टळली मोठी हानी
पुणे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, अग्निशामक दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी काम करत हाेते. काही सिलिंडरचे स्फाेट झाल्याने अागीची तीव्रता वाढली. मात्र, स्थानिक नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांच्या घरातील सिलिंडर तातडीने बाहेर अाणले. त्यामुळे सुदैवाने आणखी मोठी टळली. एकूण किती झाेपड्या जळाल्या अाहेत, याबाबत नेमका अाकडा सांगता येऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जवानांचे अथक प्रयत्न
अतिरिक्त पाेलिस अायुक्त सुनील फुलारी यांनी सांगितले की, अग्निशमनच्या गाड्या छाेट्याशा गल्लीतून अात शिरत नसल्याने जवानांनी काैशल्य वापरून अरुंद ठिकाणांवरून पाइप अात नेत अागीवर नियंत्रण मिळवले. अशा प्रकारच्या घटना भविष्यात टाळण्यासाठी मनपासाेबत चर्चा करून उपाययाेजना करण्याचा प्रयत्न करण्यात येत अाहे. शाॅर्टसर्किटने अाग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुमारे ४५० घरांपैकी ७० ते ८० घरे जळाल्याची प्राथमिक माहिती अाहे. मनपाकडून तहसीलदार व त्यांचे पथक पंचनामा करत असून त्यानंतर बाधितांचा नेमका अाकडा स्पष्ट होईल, असेही फुलारी यांनी या वेळी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.