आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबरनाथमध्ये तरुणाची अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून उडी...वाचा नंतर काय झाले..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंबरनाथमध्ये एका विक्षिप्त तरुणाने अर्धनग्न होऊन राहात्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारली. क्लिफर्ड मॅबेन (37) असे या तरुणाचे  आहे. मॅबेनने इमारतीवरून उडी घेतली परंतु, त्याचा वायरमध्ये गुंतल्याने तो चौथ्या मजर्‍याच्या टेरेसवरच पडला. त्यामुळे थोडक्यात बचावला. फायरब्रिगेडच्या जवानांनरी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले केले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, अंबरनाथच्या पनवेलकर गार्डनमधील संकुलातला ही धक्कादायक शनिवारी सकाळी घटना घडली. क्लिफर्ड मॅबेन हा युवक त्याच्या कुटुंबियांसमवेत राहतो. शनिवारी तो मॉर्निंग वॉक करून घरी परतला. घरी आल्या आल्या त्याने कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. नंतर स्वत: अर्धनग्न होत तो इमारतीच्या 6 व्या मजल्यावर गेला आणि खाली उडी घेऊन आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केला. पण, चौथ्या मजल्यावरील टेरेसजवळ असलेल्या वायरमध्ये मॅबेनचा पाय गुंतल्याने तो टेरेसवर पडला. मॅबेन किरकोळ जखमी झाला. त्याला खाली उतरवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना मोठी कसरत‍ करावी लागली. अखेख अंबरनाथच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन तास शर्तीच्या प्रयत्नानंतर जवानांनी त्याला खाली उतरवले. मॅबेन याला जवानांनी शिवाजीनगर पोलिसांच्या हवाले केले आहे.

बातम्या आणखी आहेत...