आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारी बाबूजींवर आणखी एक आरोप..संध्या मृदुल म्हणाली, आलोक नाथांनी केला होता खोलीत शिरण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- #MeToo प्रकरणात अडकलेले बॉलिवूडमधील 'संस्कारी बाबूजी' अर्थात ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अभिनेत्री संध्या मृदुल हिने आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

 

काही वर्षांपूर्वी आलोक नाथ यांनी आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा संध्या मृदुल यांनी ट्विटरवरुन केला आहे. अलोक नाथ तेव्हा मद्यधुंद अवस्थेत होते असेही संध्या मृदुलने म्हटले आहे.

 

'मि. अलोक नाथ, मी तुम्हाला माझ्यासाठी माफ केले. पण तुम्ही विनिता नंदांसोबत जे केले, त्यासाठी मी कधीच माफ करु शकत नाही. विनिता मी तुमच्या पाठीशी आहे. तुला बळ मिळू दे.'' असेही संध्या मृदुल हिने म्हटले आहे.

 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. विनिता नंदा यांनी 'फेसबुक पोस्ट' लिहून अत्याचाराला वाचा फोडली होती.

 

विनिता नंदांच्या पाठोपाठ अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती.

 

या दिग्गजावर झाले आहेत आरोप...

अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक दिग्गजांवर आतापर्यंत आरोप झाले आहेत.

 

या भाजप नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप...

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून याचा... संध्या मृदुल हिने आलोक नाथ यांच्यावर काय केले आरोप..?

बातम्या आणखी आहेत...