आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयचे CEO राहुल जोहरींवर लैंगिक शोषणाचा आरोप..नोकरीच्या बदल्यात केली होती शरीर सुखाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिलांचे लैंगिक शोषणाविरोधात सोशल मीडियावर उठलेल्या '#Metoo' वादळाने बॉलिवूडसह मीडियाला चांगलाच तडाखा दिला आहे. आता हे वादळ भारतीय क्रिकेटवर घोंगावत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

 

एका महिला पत्रकाराने राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मात्र, या महिलेने स्वत:चे नाव जाहीर केले नाही. दरम्यान, राहुल जोहरी हे एप्रिल 2016 मध्ये बीसीसीआयच्या सीईओ पदावर रुजू झाले होते.  

 

had emails sent about a BUNCH of head honchos in media. survivor has asked to not put out all the names. Rahul Johari, your #timesup #metoo pic.twitter.com/L78Ihkk1u0

— hk {on a hiatus} (@PedestrianPoet) October 12, 2018

 

नोकरीच्या बदल्यात मागितले शरीर सुख..
मायक्रो ब्लॉगिंग साइट 'ट्विटर' पर '@PedestrianPoet' नामक हँडलवरून ईमेलचा स्क्रीन शॉट शेअर करण्‍यात आला आहे. यामाध्यमातून एका महिला पत्रकाराने राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. राहुल जोहरी यांनी पीडित पत्रकाराला पाठवलेल्या ईमेलचा हा स्क्रीन शॉट आहे.

 

महिलाने सांगितले की, 'एका जॉब अपॉच्युनिटीच्या संदर्भात माझी आणि राहुल जोहरीशी ओळख झाली होती. आम्ही दोघे एका कॉॅफी शॉपमध्ये भेटले होते. तेव्हा त्याने मला नोकरीची ऑफर दिली होती. नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...