आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्री दत्ताने दाखल केला नाना पाटेकरांविरोधात FIR; सुहेल सेठवर 4 महिलांनी केले लैंगिक शोषणाचे आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- बॉलीवुडमध्ये #Metoo कॅम्पेन सुरु करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता ‍हिने गुरुवारी अभिनेता नाना पाटेकर, कोरियोग्राफर गणेश आचार्य, फिल्म डायरेक्टर राकेश सारंग आणि  प्रोड्यूसर समी सिद्दीकी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तनुश्रीने मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे.

 

तनुश्रीने पोलिसांत लेखी तक्रार दिली होती. त्यांनी पोलिसांनी तिचा जबाबही नोंदविला होता. नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा तनुश्रीने आरोप केला होता.

 

तनुश्रीने आरोप केला आहे की, 2008 मध्ये ती ‘हॉर्न ओके प्लीज’च्या एका गाण्याची शूटिंग करत असताना नाना पाटेकरांनी तिला बॅड टच केला होता. चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

 

मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले की, पाटेकर आणि त्यार आरोपींविरोधात भादंवि 354 (छेडछाड) आणि 509 (महिलेस लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारचे कृत्य करणे) गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही.

 

सुहेल सेठवर चार महिलांनी केला लैंगिक शोषणाचा आरोप
'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, लेखक आणि सेलिब्रिटी कन्सल्टंट सुहेल सेठ (55) याच्यावर चार महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यापैकी एक पीडित महिला निर्माता आहे. पीडितेने सांगितले की, ही घटना गुडगाव येथील आहे. सुहेल सेठ यांनी बळजबरीने मानेवर किस करण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर कुर्तामध्ये हात टाकला होता.

 

दूसर्‍या पीडित महिलेने सांगितले की, 2011 मध्ये गोव्यात एका कॉन्फ्रन्समध्ये सुहेल सेठ याने जबरदस्ती केली होती. मिठी मारत किस केले होते.

 

तिसरी पीडित तरुणी मुंबईची आहे. तिने आरोप केला आहे की, ऑगस्ट 2010 मध्ये ती 17-18 वर्षांची होती. तेव्हा सहुेल याने तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवला होता. बर्थ डे सेलिब्रेट करू... बेडरुममध्ये ये, असा मेसेज करत होता. पीडितेने तिच्या आईला ही बाब सांगितली. नंतर सुहेल ला तिने ब्लॉक केले होते.

 

चौथी महिला देखील मुंबईची आहे. ती 31 वर्षीय असून तिने सांगितले की, सुहेल हा तिच्या वडिलांचा मित्र आहे. दिल्लीत सुहेलसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने सेक्स आणि ऑनलाइन डेटिंगची ऑफर दिली होती. नंतर त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्शही केला होता. नंतर तो खोलीतही बोलवत होता.

बातम्या आणखी आहेत...