आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजाळे घाटाजवळ मिनीडोअर रिक्षा दरीत कोसळली; वेळीच उड्या घेतल्याने 8 प्रवासी थोडक्यात बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- यावल-भुसावळ रस्त्यादरम्यान अंजाळे घाटाजवळ प्रवासी घेऊन जात असलेली मिनीडोअर रिक्षा वेग मंदावल्याने अचानक उलट्या दिशेने खाली येत दरीत कोसळली. सुदैवाने रिक्षातील आठ प्रवासी थोडक्यात बचावले. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

 

भुसावळ यावल मार्गावर अनेक कालबाह्य झालेल्या वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक अद्याप सुरु आहे. यावल पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 

सोमवारी सकाळी भुसावळकडून यावलकडे प्रवासी घेऊन मिनीडोअर रिक्षा (MH19 जे 6068) येत होती. दरम्यान दहा वाजेच्या सुमारास अंजाळे घाटाच्या वर अंजाळेकडे येताना अचानक चढावावर मिनीडोअरचा वेग कमी झाला आणि मिनीडोअर रिक्षाखाली उलट्या दिशेने येऊ लागली. त्यात बसलेले प्रवासी घाबरले काहींनी रिक्षातून खाली उड्या घेतल्या. काही क्षणातच रिक्षा थेट दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. अपघात एका बालिकेला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

यावल-भुसावळ मार्गावर अनेक कालबाह्य झालेल्या वाहनांद्वारे बिनधास्तपणे अवैध प्रवासी वाहतूक होत असून यावल पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.  अवैध प्रवासी वाहतूक प्रवाशांच्या जीवावर उठली असताना यावल पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

घटनास्थळी गावातील नागरिकांनी धाव घेऊन तात्काळ त्या वाहनातून नागरिकांना बाहेर काढले. या अपघातामुळे कालबाह्य झालेले वाहन रस्त्यावर चालतातच कसे खाणे यावर पोलिसांची कारवाई का करत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मिनीडोअर रिक्षाच्या अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...