आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांनी चौडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन;जनतेला दिलेला प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे शनिवारी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्मारकाचे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 224 वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगांवी म्हणजे चौंडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे यांचे सकाळी चौंडी येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. येथील महादेव मंदिरात जाऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर मंदिर परिसरात असणार्‍या सभागृहात त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.

 

पंकजाताई मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय धाडसाने आलेल्या संकटावर मात करून उत्तम व आदर्श असा राज्य कारभार केला. आजच्या महिलांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याची खरी गरज आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. चौंडी तीर्थक्षेत्र विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. कार्यक्रमास जलसंधारण मंत्री राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिका राजळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौडीत आयोजित कार्यक्रमाचे फोटो.

बातम्या आणखी आहेत...