Home | Maharashtra | Mumbai | Minister Prakash Mehtas ex PA Sachin Pawar arrested For Rajeshwar Udani Murder case

राजेश्वरी उदानी हत्या प्रकरण..गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाच्या हातात बेड्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 02:47 PM IST

राजेश्वर उदानी यांचा मृतदेह पनवेलच्या जंगलात 4 डिसेंबर रोजी आढळला होता.

 • Minister Prakash Mehtas ex PA Sachin Pawar arrested For Rajeshwar Udani Murder case

  मुंबई- घाटकोपरमधील 57 वर्षीय सराफा व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. राजेश्वर उदानी यांचा मृतदेह पनवेलच्या जंगलात 4 डिसेंबर रोजी आढळला होता. उदानी

  हे 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते.

  काय आहे हे प्रकरण?

  राजेश्वर उदानी 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलिस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, 4 डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एक मृतदेह आढळला होता. सापडलेला मृतदेह राजेश्वर यांचा असल्याचे समोर आले आहे. कपडे आणि बेल्टवरुन राजेश्वर यांची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.

  प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींचीही चौकशी..

  प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजेश्वर उदानींचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  या प्रकरणी पोलिसांनी काही बारबालांचीही चौकणी केल्याचे समजते. तसेच एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचीही चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  प्रकाश मेहता म्हणाले, सचिन पवारशी काहीही संबंध नाही

  राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन पवारशी आपला कोणताही संबंध नसल्याची प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. सचिन पवारशी आपला पहिल्यांदा 2002 मध्ये संपर्क झाला होता. 2009-10 या काळात तो आपला सचिव म्हणून कार्यरत होता.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. कोण आहे सचिन पवार... कसा आला होता प्रकाश मेहतांच्या संपर्कात..

 • Minister Prakash Mehtas ex PA Sachin Pawar arrested For Rajeshwar Udani Murder case

  सचिन पवार हा 2009 मध्ये भाजपचा बूथ प्रमुख होता. 2012 मध्ये अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली

  2017 महापालिका निवडणुकीत पत्नी साक्षी पवार हिला भाजपमधून उमेदवारी मिळाली होती.  पत्नीच्या उमेदवारीनंतर सचिन पवारची भाजपमध्ये घरवापसी झाली होती.

 • Minister Prakash Mehtas ex PA Sachin Pawar arrested For Rajeshwar Udani Murder case

  घाटकोपर येथील सराफा व्यापारी राजेश्वर उदानी 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते.

Trending