आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरोदर पीडितेला पुलावरून ढकलून दिले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- मामाकडे राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून विवाहित तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता गरोदर राहिल्यावर तिच्यासोबत लग्नास करण्यास आरोपीने नकार दिला. तर मुलाच्या आईने तिला पुलावरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील सांगवी येथे घडली. शुक्रवारी रात्री उशिरा केज पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील पीडित अल्पवयीन मुलगी ही आई वडील कामानिमित्त पुण्याला वास्तव्यास असल्याने आपल्या मामाकडे सांगवी येथे राहत होती.  गावातीलच अक्षय सुभाष केदार याची  आई सुदामती सुभाष केदार हिने पीडित मुलीला मामाच्या घरी येऊन अक्षय चांगला मुलगा आहे. तु त्याच्या बरोबर लग्न कर असे म्हणत असे. मात्र वय झालेले नसल्याने व शिक्षण चालू असल्याने मुलीने लग्नास नकार होता. मात्र ओळख झाल्याने अक्षयने नेहमी घरी जाऊन मुलीशी जवळीक साधली. तिला लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवण्यास दबाव आणत भाग पाडले. दरम्यान 30 मे 2017 रोजी अक्षयने त्याच्या घरी मुलीला बोलावून जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही मुलीला पळवून नेले. यानंतर मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे पीडितेने लग्न कर म्हणून अक्षयच्या मागे तगादा लावला. मात्र त्याने नकार देत लग्नास टाळाटाळ केली. तर अक्षयच्या आईने मुलीला मारहाण करून व पुलावरून खाली ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित मुलीच्या डोक्याला, हाताला मार लागल्याने गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी मुलीने आपल्या आईला घेऊन केज पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरा केज पोलिसात अक्षय केदार, सुदामती केदार, बबलू रामकृष्ण लांब (रा.बनकरंजा), कृष्णा नखाते (रा.चंदनसावरगाव ) यांच्या  विरुद्ध कलम  बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न, बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे पुढील तपास करीत आहेत.

 

आरोपीला पत्नी आणि एक मुलगा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अक्षय केदार हा विवाहित असून त्याची पत्नी व मुलगा  बीडला राहतात. अक्षय केज शहरातील एका कापड दुकानावर काम करीत होता. त्याला मदत करणारे बबलू लांब व कृष्णा नखाते ही दोघे त्याच दुकानात काम करतात.

 

अक्षय अटकेत 

अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय केदार याला गुन्हा दाखल होताच ताब्यात घेतले. शनिवारी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर पीडितेला ही अंबाजोगाईला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...