आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HDFC बॅंकेच्या बेपत्ता व्हाईस प्रेसिडेंटचा मृतदेह अखेर सापडला; एकाला अटक, सहकार्‍यांनी हत्येचा कट रचल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एचडीएफसी बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी (39) - Divya Marathi
एचडीएफसी बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी (39)

मुंबई- एचडीएफसी बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी (39) यांचा मृतदेह कल्याणमधील खाडी परिसरात सोमवारी सकाळी आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. सिद्धार्थ संघवी हे 5 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. संघवी यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी आधीच वर्तवला होता. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. सरफराज शेख असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. रविवारी नवी मुंबई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते.

 

दरम्यान, संघवींना मिळालेल्या पदोन्नतीमुळे जळफळाट झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यानेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कटात आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. संघवी यांची कार शनिवारी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडली होती.

 

संघवी कमला मिल शाखेत होते. बुधवारी सायंकाळी ते बँकेतून बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसते. मात्र ते घरी पोहोचले नाहीत. दरम्यान, पोलिस कारमधील रक्ताचे नमुने संघवींच्या कुटुंबीयांशी जुळवून पाहत होते. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्डही तपासण्यात येत आहेत.

 

3 दिवसांपासून होते बेपत्ता रक्ताने माखलेली कार सापडली...
> सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहत होते. ते बुधवारी रात्री ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिले होते. मात्र, ते घरी पोहोचले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा फोन लावून चौकशी करण्‍याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन स्वीचऑफ येत होता.
> यानंतर एन.एम.जोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केला असता त्यांना शुक्रवारी संघवी यांची रक्ताने माखलेली कार सापडली होती. ही कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. त्याचवेळी पोलिसांना संघवी यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

बातम्या आणखी आहेत...