आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये विधानसभेत अवतरले शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अवतरले. वेगवेगळ्या वेशभूषा करुन आंदोलन करण्यासाठी ओळखले जाणारे आमदार गजभिये यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाच्या मागण्यांसाठी थेट महाराजांच्या भूमिकेत विधानभवनात प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील गजभिये यांची वेशभूषा चर्चेचा विषय ठरला होता.

 

दरम्यान, नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आंबा खाऊन अपत्य होते, या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी आमदार गजभिये यांनी भिडेंच्या वेशभूषेत आंदोलन केले होते. एवढेच नाही तर आंब्याची टोपली घेऊन आले होते. या आंब्यांवर 'संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे', असे लिहिले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... आमदार प्रकाश गजभिये यांचे शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...