Home | Maharashtra | Mumbai | Model Mansi Dixit killer has changed Destination 3 times in Mumbai

मॉडेल मानसी दीक्षित मर्डर केस... मृतदेह फेकण्‍यासाठी आरोपीने तीनदा बदलेले होते डेस्टिनेशन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 18, 2018, 05:21 PM IST

मुजम्मिलला कुठे जायचे होते, हेच त्याला कळत नव्हते. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता.

 • Model Mansi Dixit killer has changed Destination 3 times in Mumbai
  मुंबई- राजस्थानातील कोटा येथील राहाणारी मॉडेल मानसी दीक्षित हत्ये प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. आरोपी मुजम्मिल हसन यांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. मुजम्मिल याने ओला अॅपवरून तीनदा डेस्टिनेशन बदलले होते, ही माहिती ओला कॅबच्या चालकाने पोलिसांना दिली आहे.


  पोलिसांनी सांगितले की, कॅब चालकाच्या मदतीमुळेच आरोपीला जेरबंद करता आले. बॅग उचलण्यासाठी मुजम्मिल याला मदत केल्याचे चालकाने सांगितले. मात्र, बॅग खूप वजनदार होती. आरोपीने अंधेरी (पश्चिम) मधील अल-ओहद बिल्डिंग परिसरातून ओला कॅब बुक केली होती. याच बिल्डिंगमध्ये मानसीची हत्या झाली होती. दुपारी अडीच वाजता मुजम्मिल याने डेस्टिनेशनमध्ये एअरपोर्ट लिहिले होते. परंतु चालक जसा मिल्लत नगरहून निघाला तसा त्याने लोकेशन बदलून गोरेगांव बस डेपो केले. मुजम्मिलला कुठे जायचे होते, हेच त्याला कळत नव्हते. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता.

  चालकाने पोलिसांना सांगितले की, मुजम्मिल याने मालाडमध्ये गाडी थांबविण्यास सांगितले. तो गाडीखाली उतरला. झुडपाजवळ गेला आणि त्याने सूटकेस फेकली. मुजम्मिल गाडी खाली उतरला तेव्हा त्यांची देहबोली काही वेगळेच सांगत असल्याचे दिसले. नंतर कंट्रोल रूमला फोन करून पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला.

  मुजम्मिलला कुठे जायचे होते, हेच त्याला कळत नव्हते. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता.
  आरोपी मुजम्मिल याला कोर्टने 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुजम्मिल हा हैदराबादमधील एका कॉलेजचा विद्यार्थी आहे. गेल्या आठवड्यात तो त्याच्या दोन भावांसोबत मुंबईला आला होता. त्याचे वडील मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरी असून त्यांनी मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला आहे.

  यामुळे झाली मॉडेलची हत्या
  बांगूरनगर पोलिसांच्या मते, मिल्लतनगरातील रहिवासी मुजम्मिल सईद (20) नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुजम्मिलने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यने सांगितले की, घटनेच्या वेळी मानसी त्याच्या फ्लॅटमध्येच होती. दोघांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला आणि चुकून त्याने मानसीच्या डोक्यावर स्टूल मारला, यामुळे अनवधानाने मानसीचा मृत्यू झाला.

  कोण होती मानसी?
  मानसी ही मूळ कोटा येथील होती. ती 6-7 महिन्यांपासून मुंबईत मॉडेलिंग करत होती. मानसी टीव्ही सीरियलमध्ये दिसली होती. दरम्यान, मानसीचे आई-वडील मागील चारवर्षांपासून कोटा स्टेशनजवळील रेल्वे कॉलनीत राहात होते. तिचे वडील रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरीला होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. मानसीची थोरली बहीण दीक्षा दीक्षित ही वडीलांच्या जागेवर रेल्वेत नोकरी करत आहे. मानसी हनुमान जयंतीला शेवटची घरी गेली होती

Trending