आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळीपूर्वीच \'दिवाळी भेट\', 2 वर्षे मोफत विमान प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारने दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 वर्षे मोफत विमानप्रवास करता येणार आहे. सरकारने लीव्ह ट्रॅव्हल स्कीम (एलटीसी) योजनेच्या मुदतीत दोन वर्षांची वाढ केली आहे. याबाबत कामगार मंत्रालयाने अध्यादेश काढला आहे.

 

कामगार आणि प्रशिक्षण मंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशानुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 26 सप्टेंबर 2018 ते 25 सप्टेंबर 2020 पर्यंत या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येईल. कर्मचार्‍यांना उत्तर पूर्व क्षेत्र, अंदमान-निकोबार बेटांवर मोफत विमान प्रवासाचा आनंद घेता येईल. या योजनेचा 48.81 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

 

एलटीसी योजनेला 2014 मध्ये मंजुरी

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (एलटीसी योजनेला मोदी सरकारन 2014 मध्येच मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे सरकार योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...