आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॅमवर ड्रोन कॅमेरा उडवित होता हा व्यक्ति, पाण्यात अचानक दिसला रहस्यमयी भोवरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को- फोटोग्राफीचा छंद जोपासणारा एक व्यक्ति डॅममध्ये ड्रोन कॅमेर्‍याने छायाचित्रे आणि व्हिडिओ घेत होता. अचानक त्याला पाण्यात एक भला मोठा भोवरा दिसला. त्याने भोवर्‍याच्या दिशेने ड्रोन कॅमेरा नेला असता ड्रोन भोवर्‍यात ओढला जात होता. त्याने तत्काळ ड्रोन तेथून बाजुला केला. ड्रोनने क्लिक केलेली छायाचित्रे पाहिली असता तो प्रचंड घाबरला.

 

डॅमच्या एका कोपर्‍यात पाण्यात जवळफास 70 फूट रुंद एक भोवरा होता. तो प्रचंड वेगात पाणी आत खेचत होता.

 

अखेर काय होते रहस्य..

- मोन्टकिलो डॅम येथील हा किस्सा आहे. बॅरेसा तलावावर हा डॅम आहे. 1950 मध्ये बांधलेल्या या डॅममधून उत्तर भागाला वीज आणि पाणी पुरवठा केला जातो. परंतु डॅममधील पाण्याच्या मध्यवर्ती भागात एक रहस्यमयी भोवरा आहे. इवान किलकस नामक फोटोग्राफर या भोवर्‍याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

कुठे जात होते पाणी..?

- इवान याने छायाचित्रे पाहून डॅम परिसरातील नागरिकांकडे विचारणा केली. मात्र, ते या रहस्यमयी भोवर्‍यासंदर्भात अनभिज्ञ होते. मात्र, इवानला एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे  भोवर्‍यात प्रचंड वेगाने ओढले जाणारे पाणी नेमके कुठे जात होते. या भागात 10 वर्षांपूर्वी प्रचंड दुष्काळ होता. यामुळे इवान याने रहस्यमयी भोवर्‍यामागील रहस्य सोडविण्याचा प्रयत्न केला.

 

एक महिला की मौत की कहानी आई सामने
इवान याने या भोवर्‍यासंदर्भात‍ ऑनलाइन  माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याला कोणतीच माहिती मिळाली नाह. परंतु त्याला एका वेबसाइटवर महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली. धक्कादायक म्हणजे या महिलेचा मृत्यू या भोवर्‍यामुळे झाला होता.

 

1997 मध्ये एक महिला या डॅमच्या काठावर अंघोळ करत होती. अचानक ती पाण्यात निर्माण झालेल्या भोवर्‍यात खेचली गेली. त्यातच तिचा मृत्यू झाला.


- या घटनेबाबत वाचल्यानंतर इवानमध्ये या भोवर्‍याबाबत उत्सुकता अाणखी वाढली. त्याने अनेक मित्रांनी फोटो पाठविले. नंतर डझनभर ड्रोन कॅमेरे डॅमवर फिरू लागले.

 

नंतर झाला धक्कादायक खुलासा..

- इवान याला या रहस्यमयी भोवर्‍याबाबत संपूर्ण माहिती गोळा करायची होती. नेमके पाणी कुठे जाते, या रहस्यावरचा पडदा त्याला बाजुला करायचा होता. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने डझणभर ड्रोन डॅम परिसरात पाठविले. तितक्यात डॅम अ‍धिकार्‍याला याबाबत माहिती मिळाली.

- डॅमच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने इवानला पाण्यातील भल्या मोठ्या भोवर्‍याचे रहस्य सांगितले. डॅमचे बांधकाम सुरु होते तेव्हाच हा मोठा खड्डा बनविण्यात आला होता. खड्ड्यांची  उंची ही डॅमच्या भिंतीच्या बरोबरीने आहे. डॅममध्ये जास्त पाणी आल्याने ते गेटमधून बाहेरयेण्या ऐवजी ते या खड्ड्यातून शेजारच्या तलावात जाते.

- मात्र, मागील 10 वर्षांत दुष्‍काळामुळे हा डॅम पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे पाण्यात हा भोवरा यापूर्वी कधी निर्माण झाला नाही. 

- इवान  याने या रहस्यमयी भोवर्‍याची माहिती यूट्यूब चॅनलवर शेअर केली. लाखो युजर्सनी ही माहिती पाहिली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...