आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात सराईत गुन्हेगाराची गळा चिरुन निर्घृण हत्या..चाकुने शरीरावर केले अनेक वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात एका तरुणाची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्‍यात आल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दत्ता चंद्रभान उढाण (30, रा. चंदनझिरा, जालना) असे मृताचे नाव आहे. मृत तरूण विविध गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चंदनझिरा पोलिस स्टेशनसह कदीम, तालुका पोलिस ठाण्यातही चोरी, रॉबरी, लुटमार, दरोड्यासारख्या 12 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. जी. गिरासे यांनी दिली.

 

खून झाल्याचे माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची पाहणी करुन नोंद करण्‍यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 

ही घटना सकाळी चारवाजेच्या सुमारास घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, दत्ता हा चंदनझीरा भागातील मटन गल्ली या भागातील सोमवारी एका जागरणाच्या कार्यक्रमासाठी गेला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या ठिकाणीही वादही झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक एस. जी. गिरासे, पोलिस कर्मचारी अनिल काळे यांच्यासह तपासासाठी प्रयत्न करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...