Home | National | Other State | Mother murdered Three children case in kapurthala

आईनेच केली दोन मुलींची हत्या..मग दिराच्या मुलालाही पाजले विष; आता तुरुंगात काढणार आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 08:39 PM IST

सरबजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. आता सरबजीतला पुढील आयुष्य तुरुंगात काढावे लागणार आहे.

 • Mother murdered Three children case in kapurthala

  कपूरथला (पंजाब)- तीन वर्षांपूर्वी (2015) पोटच्या दोन मुलींची गळा आवळून हत्या केली. मग दिराच्या मुलाला विष पाजून ठार मारल्याप्रकरणी एका महिलेला कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सरबजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. आता सरबजीतला पुढील आयुष्य तुरुंगात काढावे लागणार आहे.

  पोटच्या मुलींची गळा आवळून केली होती हत्या...

  - जुलै 2014 मध्ये आरोपी महिलेचा पती बलजीत सिंग हा ग्रीसला जाण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवरच पोहोचला होता. तितक्यात आरोपी सरबजीत कौर ‍हिने मोठी मुलगी अमनप्रीत हिची गळा आवळून हत्या केली. नंतर बलजीतला दिल्लीहून परत बोलवण्यात आले होते. या घटनेला 26 दिवस उलटत नाही तोच बलजीत काही कामाने बाहेर गेला असता सरबजीत हिने धाकटी मुलगी नवजीत ही शाळेतून घरी आल्यानंतर तिचा गळा दाबून ठार मारले होते.
  - या घटनेबाबत बलजीत सिंगने कुठेच वाच्यता केली नाही.

  मात्र, सरबजीत हिने 26 सप्टेंबर 2014 रोजी दुपारी 3 वाजता दिराचा मुलगा मनिंदर सिंग याला लक्ष्य केले. त्याला ती आपल्या खोलीत घेऊन गेली. नंतर त्याला विष पाजले. घरातील लोक खोलीत आले तेव्हा सरबजीतच्या मांडीवर मनिंदर हा मृतावस्थेत पडला होता. या प्रकरणी सरबजीत कौरला पोलिसांनी अटक केली होती. सरबजीत कौरला कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Trending