आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला पोटाशी बांधून आईने तलावात उडी घेऊन केली आत्महत्या; चंद्रपुरातील हृदयद्रावक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आईने मुलाला पोटाला बांधून शहरातील रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेने पाहणाऱ्यांची मने हेलावून गेली. रुपाली आशिष गुज्जेवार (वय-28) आणि अभिर अशिष गुज्जेवार (वय-5) अशी मृतांची नावे आहेत. पी. एच. नगरमध्ये राहणारे हे दोघे 19 तारखेच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते.

 

रामाळा तलावात मृतदेह असल्याचे बुधवारी सकाळी तलावात गेलेल्या नावाड्याच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. तात्काळ मृतदेह काढण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले. आईचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर साऱ्यांनाच धक्का बसला. महिलेच्या पोटाला मुलगा बांधल्याचे आढळून आले. मुलाला पोटाशी बांधून आत्महत्या का केली असावी, याचा शोध पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...