आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मंत्र्याला नागडा करून हाणल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा नाशकात सज्जड इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- १ ऑगस्टला दुधासाठी वाढीव दर जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक संस्थांना अजूनही सरकारने पैसे दिलेले नाहीत. सरकार व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संस्था दरवाढ न देण्याच्या विचारापर्यंत आहेत. तसे झाल्यास १ ऑक्टोबरनंतर कोणताही मंत्री आला तर त्याचे कपडे काढून नागडे करून ठोका, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पांगरी येथील शेतकरी मेळाव्यात दिला. 


मेळाव्यास प्रवक्ते संदीप जगताप, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, माणिकराव कदम, कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, श्रीकांत पवार, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमरसिंह कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, बारकू पगार, रसिका ढगे उपस्थित होते. यावेळी दूध आंदोलनातील ३५३ चे गुन्हे दाखल झालेले रवींद्र पगार, आत्माराम पगार, शांताराम पगार, बाबासाहेब पगार, कृष्णा घुमरे, विश्वनाथ पगार, वसंत पगार, संजय वारुळे, धनंजय निरगुडे, कैलास शिंदे, बारकू पगार यांचा गौरव खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. दूध आंदोलनाची दखल घेऊन दरवाढ करावी लागल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकार नमू शकते असे ते म्हणाले. दुधाचे पाच देयके होऊन गेले तरीही दरवाढीचे पैसे सरकारने दिले नाहीत. त्यामुळे भविष्यात आंदोलन आणखी तीव्रपणे करावे लागणार असेही ते म्हणाले. 


भविष्यात ३५३ विरोधात लढा देण्याचे लक्ष 
भ्रष्ट राज्यकर्ते व सरकारी कर्मचारी यांची अभद्र युती असून ३५३ सारख्या कायद्याने भ्रष्ट कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळवून दिले आहे. सध्याच्या सरकारने ३५३ चे हत्यार प्रभावी केल्याचा आरोप खासदार शेट्टी यांनी केला. भविष्यात या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला. 

 

बातम्या आणखी आहेत...