आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनी ट्रॅप..मुंबईतून विद्यार्थी बेपत्ता, पाकिस्तानात दहशतवादी बनण्‍यासाठी गेल्याचा नातेवाईकांना संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुलुंड परिसरातील एक 23 वर्षीय विद्यार्थी मंगळवारपासून बेपत्ता आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिस इंटेलीजन्सच्या (आयएसआय) 'हनी ट्रॅप'ला तो बळी ठरल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथक (एटीस) या विद्यार्थ्याचा शोध घेत आहे.

 

एग्झाम फॉर्म भरण्यासाठी निघाला होता घरातून...

मुलुंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जगदीश परिहार असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तो मंगळवारी एग्झाम फॉर्म भरण्यासाठी मुंबई यूनिव्हर्सिटीत जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. तो बीकॉमच्या तिसर्‍या वर्षाचा विद्यार्थी होता. सकाळी घराबाहेर पडलेला जगदीश रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो न सापडल्याने बुधवारी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

 

येथे सापडले मोबाइलचे शेवटचे लोकेशन
जगदीशने शेवटचा कॉल त्याच्या भावाला केला होता. जगदीश म्हणाला, हिंदू धर्मावर आता त्याचा विश्यास नाही. यासाठी तो इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जात आहे. तो आता कधीच घरी परत येणार नाही. त्यानंतर जगदीशने आपला मोबाइल बंद केला. पोलिसांनी जगदीशचा कॉल ट्रेस करून पाहिला असता त्याचे शेवटचे लोकेशन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखवत होते.

 

एक महिन्यापासून 'फेसबूक'वर सक्रिय होता जगदीश
जगदीशच्या नातेवाईकांनी सांगितले की, जगदीश मागील एक महिन्यापासून फेसबूक जास्त सक्रिय होता. एका महिलेशी कायम चॅट करत होता. कदाचित या महिलेनेच त्याचा ब्रेन वॉश केला असावा. बेपत्ता होण्यापूर्वी जगदीशने आपला लॅपटॉप फॉर्मेट केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...