Home | Maharashtra | Mumbai | Mumbai dabbawala will go to ayodhya to support shiv sena

उद्धव ठाकरेंसोबत डबेवालेही अयोद्धेला जाणार, निवडणुकीआधी राम मंदिर मुद्दा हायजॅक करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 03:46 PM IST

येत्या काळात राम मंदिराचा विषय चर्चेत राहाणार हे निश्चित आहे.

 • Mumbai dabbawala will go to ayodhya to support shiv sena

  मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येकडे कूच करणार आहेत. या मोहिमेला मुंबई डबेवाला असोशिएशनने पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत डबेवालेही अयोद्धेला जाणार असल्याची माहिती डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

  दरम्यान, मुंबईतून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोद्धेला जाणार असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्‍यात आल्याचे समजते. याच रेल्वेने डबेवालेही अयोद्धेला रवाना होतील, असेही तळेकर यांनी सांगितले.


  मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात येत्या 25 नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता राम मंदिर मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे, तो आमच्यामुळेच, असा दावाही उद्धव यांनी संघाच्या तीन दिवसानंतरच्या शिबिरानंतर केला होता. लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याचे हे शिवसेनेचे प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

  राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदुत्त्ववादी संघटनांसह काँग्रेसनेही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच म्हटले होते. यामुळे येत्या काळात राम मंदिराचा विषय चर्चेत राहाणार हे निश्चित आहे.

  डबेवाल्यांच्या संकटाच्या काळात ठाकरे कुटूंब व शिवसेना नेहमी डबेवाल्यांच्या मागे उभी राहत आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मागे खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्णय मुंबई डबेवाला असोशिएशनने घेतला आहे. सुभाष तळेकर यांचे नेतृत्त्वाखाली एक शिष्टमंडळ अयोध्देला रवाना होणार आहे. या शिष्टमंडळात स्वत: सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, कैलाश शिंदे, आनंथा तळेकर यांचा समावेश असेल. दरम्यान, डबेपोहोचविण्याच्या व्यवसायावर याचा काही परिणाम होणार नाही, व्यवसाय नेहमी सारखा सुरु राहील. त्यात कोणताही खंड पडणार नाही, असेही तळेकरांनी सांगितले.

Trending