आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मुंबईच्या मॉडेलचा अश्लाघ्य डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन- बारा ज्योर्तिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर मंदिरात शिवभक्तांची कायम गर्दी असते. मात्र, मुंबईच्या एका मॉडेलने मंदिराच्या आवारात अश्लाघ्य डान्स केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मॉडेलच्या अश्लाघ्य डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

रिपोर्टनुसार, पांढर्‍या सारीत मंदिर परिसरात अश्लाघ्य डान्स करणार्‍या मॉडेलचे नाव नंदिनी कुरील असे आहे. विशेष म्हणजे नंदिनी स्वत: हा व्हिडिओ सोशल साइट्‍सवर पोस्ट केला होता. या व्हिडिओत दिसणार्‍या मॉडेल तरुणीवर ‍टिकेची झोड उठल्यानंतर तिने व्हिडिओ डिलीट केला आहे. मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून मॉडेल विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...