आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांसमोरच कपडे उतरविणार्‍या मॉडेलने स्वत:ला सांगितले \'मी टू\'चा बळी, समोर आला धक्कादायक व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एक दिवस आधी मुंबईतील मॉडेलने पोलिसांसमोर स्वत: कपडे उतरवून गोंधळ घातला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मॉडेलने नशेत सिक्युरिटी गार्डला थापड लगावल्याचा आरोप आहे. आता मॉडेलने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. तिने स्वत:ला 'मी टू'चा बळी असल्याचे सांगितले आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. त्यात मॉडेल सेक्युरिटीला थापड मारताना दिसत आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

ओशिवारा येथील एका इमारतीमध्ये नशेत तर्रर्र असलेल्या एका मॉडेलने तासभर धिंगाणा केला होता. तिचा बिल्डिंगच्या सिक्युरिटीसोबत वाद घातला होता. हे प्रकरण एवढे चिघळले की घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्‍यात आले होते. तरीही ती तरुणी ऐकण्यास तयार नव्हती. तिला पोलिस स्टेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी या तरुणीने आपल्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. पोलिसांसमोर तरुणीचा असला हायव्होल्टेज ड्रामा पाहून सगळेच हैराण झाले.


सिगारेट नाही आणल्याचा होता राग
प्रत्यक्षात ही घटना 25 ऑक्टोबरची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एका इमारतीमध्ये नशेत तर्रर्र असलेली तरुणी धिंगाणा घालत असल्याची तक्रार मिळाली होती. तिने एका वॉचमनकडून सिगारेट मागवली होती. परंतु, वॉचमनने तिचे काम ऐकले नाही. याच गोष्टीवरून तरुणीला एवढा राग आला की तिने राडा केला. शेजाऱ्यांना आणि वॉचमनला परिस्थिती हाताळणे कठीण झाल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले होते. पोलिस तिला चौकशीसाठी घेऊन जात होते, त्यावेळी तरुणी आणखी भडकली. तिने आपल्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. शेजारीच थांबलेल्या लोकांनी तिचा हा कारनामा आपल्या मोबाईलमध्ये टिपला. या व्हिडिओमध्ये ती वॉचमनला मारण्याचा प्रयत्न करताना देखील दिसून येत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित मॉडेलचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...