आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या टीव्ही अॅक्ट्रेसवर फेसबुक फ्रेंडकडून राजस्थानात बलात्कार, फोर्ट पॅलेस पाहाण्यासाठी आली होती तरुणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नीमराना (राजस्थान)- नीमराना येथे फोर्ट पॅलेस पाहाण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका टीव्ही अॅक्ट्रेसवर तिच्या फेसबुक फ्रेंडने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी टीव्ही अॅक्ट्रेससोबत राजस्थाना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबला होता. तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

 

हायवेवरील हॉटेल ग्रँड तारा आणि रमाडामध्ये 4 व 5 ऑगस्टच्या रात्री झालेल्या कथित घटनेप्रकरणी पीडित अॅक्ट्रेसने मुंबईतील ओशिवरा-अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. झिरो एफआयआरच्या आधारावर नीमराना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

पीडितेने सांग‍ितले की, 4 ऑगस्टला ती तिच्या फेसबुक फ्रेंड सौरभसोबत गुरुग्रामहून रात्री सव्वा बारा वाजता नीमराना फोर्ट पॅलेसला पोहोचली. पॅलेसमध्ये रुम न मिळाल्याने ते एनएच-8 हायवेवरील ग्रॅंड तारा हॉटेलला पोहोचले. हॉटेलच्या रुममध्ये आरोपी सौरभ तोलानी (रा.लखनऊ, यूपी) याने पीडितेवर बलात्कार केला. आरोपी तिला म्हणाला की, 'माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. लवकरच तुझ्यासोबत लग्न करेन.' त्यामुळे मी त्याला विरोध करू शकले नाही. नंतर 5 ऑगस्टला आरोपी तिला शाहजहांपूर  येथील रमाडा हॉटेलमध्ये नेले. येथेही आरोपीने पीडितेची इच्छा नसतानाही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

 

फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर जळले प्रेम..
पीडितेने सांगितले की, 2014 मध्ये ती शिक्षण घेत असताना फेसबुक आणि हॉट्‍सअॅपवर आरोपी सौरभसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांचा संपर्क तुटला. वर्ष 2018 मध्ये पुन्हा दोघे फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आले. नंतर दोघे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तासंतास संवाद साधू लागले. दोघांमध्ये प्रेम फुलले. आरोपीने पीडितेला आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले. मात्र, तो तिला फिरविण्यासाठी गुरुग्राम आणि नीमराना येथे घेऊन गेला. यादरम्यान त्याने वेगवेगळ्या हॉटेलवर पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. आता मात्र, आरोपीने पीडितेसोबत विवाह करण्यास तपशेल नकार दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...