आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला हत्याकांड...मंदिराचा पुजारीच निघाला आकाशचा मारेकरी; मंदिर परिसरातच पुरला होता मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एखाद्या सिनेमाचे कथानक होईल, अशी धक्कादायक घटना शहरात  उघड झाली आहे. पोलिसांनी तब्बल 29 दिवसांनी एका हत्येचा उलगडा केला आहे. आकाश तूपे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो 9 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. हत्येप्रकरणी पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल सुखदेव भारती याला अटक केली आहे. आपण घेतलेला देशी कट्टा आकाश परत देत नाही, म्हणून पुजार्‍याने त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह मंदिराच्या परिसरात पुरल्याची कबुली आरोपीने दिली आहे.


मिळालेली माहिती अशी की, अकोल्यातील आकाश तूपे हा युवक महिनाभरापासून बेपत्ता होता. आकाश 9 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घराकडे निघाला होता. मात्र, रात्री उशीर झाला परंतु तो घरी पोहोचला नाही. आकाशच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिसांत नोंदविली होती.

 

या प्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान 15 सप्टेंबर रोजी शास्त्री नगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाक्यात आकाशची चप्पल आढळली होती. त्या आधारावर पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल भारतीभोवती तपास केंद्रीत केला. भारती देखील 9 सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याचे समोर आल्याने पोलिसांचा पहिल्या दिवसापासून त्याच्यावर संशय होता. त्यानंतर पोलिसांना मंदिराचा पुजारी हा अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली, त्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक शेख हासम, पोलिस कर्मचारी संजय सोनटक्के, दिलीप उमाळे, जगदीश इंगळे यांनी अहमदाबादमधून पुजारी याला अटक केली.

 

पोलिस तपासात खळबळजनक तथ्य समोर...
आरोपी भारतीने आकाशची 9 सप्टेंबरला रात्री हत्या केली. नंतर मृतदेह शास्त्री नगर परिसरातील मंदिराच्या आवारात जमिनीत पुरल्याची कबुली दिली. त्या माहित्याची आधारावर पोलिसांनी सोमवारी मंदिर परिसर खोदून आकाशाचा मृतदेह बाहेर काढला आहे.

 

देशी कट्ट्‍याच्या वादातून आकाशची हत्या..

आकाशची हत्या देशी कट्टाच्या वादातून झाली. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

-उमेश माने पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी

 

बातम्या आणखी आहेत...