आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाेदकामामुळे कालवा फुटला..पुण्यात पूर; 150 संसार उघड्यावर, सिंहगड रस्त्याजवळ झाेपडपट्टीत हाहाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सिंहगड रस्त्यावरील मुठा उजव्या कालव्याची भिंत गुरुवारी सकाळी काेसळून पाण्याचे लाेट रस्त्यावर वाहू लागले. दांडेकर पूल परिसरात जणू पूरपरिस्थिती निर्माण झाली हाेती. झाेपडपट्टीतील शेकडाे घरांमध्ये पाणी शिरल्याने १५० संसार उघड्यावर अाले. अनेक घरातील फ्रिज, सिलिंडर, कागदपत्रे वाहून गेली. रस्त्यावरील गाड्याही वाहून गेल्या. दरम्यान, कालव्याच्या भिंतीजवळ काही कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी खाेदकाम केल्याने तेथील माती भुसभुशीत हाेऊन भिंत काेसळली, अशी तक्रार स्थानिक करत अाहेत. 


मुलाच्या शिक्षणासाठी जमवलेले दीड लाखही पाण्यात 
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हमाली करणारे सुरेश बाेडेकर यांनी काबाडकष्ट करून अाणि मित्रांकडून उधार-उसनवारी करून मुलाच्या शिक्षणासाठी जमवलेले दीड लाख रुपये घरात ठेवले हाेते. मुलाला जेईईचा क्लास लावून इंजिनिअर करण्याचे त्यांचे स्वप्न हाेते. मात्र या पुरामुळे त्यांच्या घरातील संसाराेपयाेगी साहित्य व पैसेही वाहून गेले. अाता मुलाला इंजिनिअर करणार कसे, असा प्रश्न बाेडेकर कुटुंबीयांना पडला अाहे. 

 

स्थानिक नगरसेवक आले उशिरा..

कालव्याचे पाण्याचा सर्वात जास्त फटका जनता वसाहतीत राहाणार्‍या नागरिकांना बसला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. पाण्यामुळे अनेक घरांना तडे गेले आहेत.

स्थानिक नगरसेवक घटनास्थळी उशिरा आल्याने वातावरण तापले आहे.

 

महापाैरांना नागरिकांचा घेराव
परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापाैर मुक्ता टिळक या दांडेकर पुल परिसरातील जनता वसाहतीत अाल्या असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घालत अाम्हाला नुकसान भरपार्इ काेण देणार, अामच्या मदतीला वेळेला प्रशासनाचे काेणीच धावून अाले नाही असे सांगत तक्रारींचा भडिमार केला. टिळक यांनी याप्रकरणी मनपाने वारंवार पाटबंधारे खात्यास सूचना दिल्या हाेत्या असे सांगत सध्या अाप्तकालीन परिस्थीतीशी सामना करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. लाेकांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून सर्व लाेकप्रतीनिधींनी मिळून त्यावर उपाययाेजना करु असे स्पष्ट केले अाहे. कालव्याशी संबंधित काेणत्या तृटी राहिल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवार्इ केली जार्इल असे त्यांनी सांगितले.
 
गळती वाढत गेल्याने घटना घडली
मुठा उजवा कालवा नेमका ज्याठिकाणी फुटला त्याबाबतची पाहणी केल्यावर खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, कालव्याच्या भिंतीच्या विविध ठिकाणी गळती हाेत असून सदर गळती याठिकाणी वाढत जाऊन कालवा फुटला अाहे. पुण्याचे पाणी पुरवठयावर ही या दुर्घटनेमुळे परिणाम हाेणार अाहे. खडकवासला धरणातून निघाल्यानंतर हा कालवा पर्वती जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत येताे. तिथपर्यंत पाणी घेता येर्इल मात्र, त्यापुढे पाणी नेता येणार नाही. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून पुण्यातील ज्या भागाला पाणी जाते ताे भाग वगळुन उर्वरित भागाला पाणीपुरवठा करता येणार नाही. पर्वती जलशुध्दीकरण केंद्रानंतर पाणी कॅन्टान्मेंट जलशुध्दीकरण केंद्र व इतर केंद्रात जात असते, मात्र कालवा फुटल्याने तिथपर्यंत पाणी पाेहचवता येणार नाही.  
 
कालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च केला नाही
माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे दुष्काळी भागाला तसेच शेतीला पाणीपुरवठा केला जाताे. कालव्याची डागडुजी करण्याकरिता दाेन काेटीचा खर्च करणे अपेक्षित हाेते मात्र, ताे सरकारने न केल्याने ही दुर्घटना घडली. भाजपच्या गलथन कारभारचा पुण्यातील नागरिकांना फटका बसला असून लाेकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले अाहे त्याची नुकसान भरपार्इ शासनाने द्यावी. लाखाे लिटर शेतीचे व पिण्याचे पाणी या दुर्घटनेमुळे वाया गेले असून त्याला काेण जबाबदार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सत्ताधारी भाजप मध्ये प्रशासनाकडून काम करुन घेण्याची धमक नसल्याची खरमरीत टिका त्यांनी याप्रसंगी केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करू पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...