आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमर्‍यात कैद..अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, कोणी ओढले केस तर कोणी केली अश्लील शिविगाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या एका परिसरात काही नागरिकांनी अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर एका दुकानात चोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कोणी तिचे केस ओढत होते तर कोणी तिला अश्लील शिविगाळही करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेत तब्बल डझणभर लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेली माहिती अशी की, शहरातील जरिपटका भागात ही घटना शुक्रवारी (ता. 23) घडली होती. नागपूरातील हा सर्वाधिक वर्दळ असलेला हा परिसर आहे. पी‍डित मुलगी चोरीचपटी करते. शुक्रवारी तिला एका दुकानात चोरी करताना रंगेहात अटक करण्‍यात आले. तिला नागरिकांनी पकडताच तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने तिचे केस ओढले तर कोणी तिला अश्लील शब्दात शिविगाळ केली. काही लोक तर तिला 'बॅड टच'ही करताना दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...