आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या वासुदेवचे थेट गौरी लंकेश हत्येशी संबंध? 2 कार, 6 दुचाकी जप्त; बीडमध्ये वाहने केली नष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- जळगाव जिल्ह्यातील साकळी येथे वासुदेव सुर्यवंशीचे थेट कर्नाटक कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्येशी वासुदेव सुर्यवंशीचा संबंध असून त्याच्याकडून दोन कार, सहा दुचाकी दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच कर्नाटक पोलिस वासुदेवचा ताबा घेण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.


नालासोपारा स्फोटक प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या दोघांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वासुदेव सुर्यवंशीचा थेट संबध कर्नाटकमधील गौरी लंकेश यांच्या हत्येशी असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. 25 सप्टेंबरला वासुदेव सुर्यवंशी याची पोलिस कोठडी समाप्त होत आहे. नंतर त्याचा ताबा कर्नाटक पोलिस घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने 6 सप्टेंबरला साखळी येथून वासुदेव सूर्यवंशी व 7 सप्टेंबरला विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी यास ताब्यात घेतले होते. या दोघांची एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. सूर्यवंशी याने दिलेल्या माहितीवरून दोन कार, सहा दुचाकी एटीएसने हस्तगत केल्या आहेत. सूर्यवंशी याचा गौरी लंकेशसह नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत सहभाग होता. याने आरोपींना वाहने पुरवली व नंतर ती वाहने नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. गौरी लंकेश यांच्या घराची रेकी करण्यासाठी वापरलेली वाहने सुर्यवंशीने बीडमध्ये नष्ट केल्याची कबुली दिल्याचे एटीएसच्या सुत्रांनी सांगितले आहेत.


'काका' या टोपण नावाने वासुदेवची विशेष ओळख
या संपूर्ण कटात सहभागी असलेल्या संशयीतांमध्ये 'काका' या टोपण नावाने वासुदेव सूर्यवंशीची एक विशेष ओळख होती. तेव्हा आता एटीएसचे पोलिस कोठडी संपल्यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक सूर्यवंशी याला ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गावकऱ्यांना विश्वास बसत नाही...
एटीएसच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या या माहितीमुळे यावल तालुक्यासह साकळीत खळबळ उडाली आहे. गावात एक मॅकॅनिक म्हणून शांत स्वभावाने आपला व्यवसाय करणारा वासुदेव अशा पद्धतीचे काही कृत्ये करेल, यावर गावकऱ्यांचा अजूनही विश्वास बसत नाही आहे. तेव्हा या घटनेत पुढे अजून काय होईल याकडे संपूर्ण परिसराची लक्ष लागून आहे.

 

बातम्या आणखी आहेत...