Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Nashik BJP Corporators Withdraw No Confidence Motion Against Commissioner Tukaram Mundhe

मुख्यमंत्र्यांचे आदेश मिळताच मुंढेंवरील अविश्वास ठराव मागे; भाजप नगरसेवक पडले तोंडघशी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 08:17 AM IST

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे.

  • Nashik BJP Corporators Withdraw No Confidence Motion Against Commissioner Tukaram Mundhe

    नाशिक- अन्यायकारक करवाढ कमी करण्याच्या मुद्यावर नाशिक मनपा अायुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतल्यामुळे शुक्रवारी सकाळी थेट मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींच्याच अादेशावरून सत्ताधारी भाजपने अविश्वास ठराव मागे घेण्याची भूमिका घेतली. महापाैर रंजना भानसी यांनी ही भूमिका जाहीर केल्यामुळे सत्ताधारी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक चांगलेच ताेंडघशी पडले. दरम्यान, शनिवारी १ सप्टेंबर राेजी अायाेजित विशेष महासभा महापाैरांनी रद्द केली.


    १ एप्रिल २०१८ पासून अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकतीसह शहरातील इंच अाणि इंच जमिनीला लागू केलेल्या करवाढीवरून गेल्या अनेक दिवसात अायुक्त मुंढे विरुद्ध लाेकप्रतिनिधी असा संघर्ष हाेता. सुरुवातीला भाजपच करवाढीमागे असल्याची टीका झाली. विराेधकांनीही अाक्रमक पवित्रा घेतला हाेता. त्यानंतर गावातून करवाढीविराेधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यावर सत्ताधारी भाजपने अविश्वासाचे अस्त्र उपसले. अर्थात अायुक्तांची हुकूमशाही, नगरसेवकांच्या अधिकारावरील गदा असेही अन्य कंगाेरे त्यास हाेते.


    दरम्यान, अविश्वास ठराव दाेन दिवसावर आल्यानंतर मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत काही प्रमाणात करवाढीची तीव्रता कमी केली. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या अादेशानुसार करवाढ कमी केल्याचाही दावा केला हाेता. अशातच महापाैरांनी विशेष महासभेत काय भूमिका घ्यायची ती घेऊ, असे सांगितले हाेते. दरम्यान, शुक्रवारी महापाैरांनी पक्षश्रेष्ठींच्या अादेशानुसार करवाढ स्थगित करत असल्याचे निराेप माध्यमांना दिल्यानंतर यावर सध्यातरी पडदा पडला आहे.

Trending