आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रतर्फे \'राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा 2018\'चे आयोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एक छायाचित्र हे अत्यंत प्रभावी व बातमीच्या तोलामोलाचे असते, म्हणूनच तर छायाचित्र पत्रकारिता महत्त्वाची मानले जाते. विविध माध्यमांतील माध्यमकर्मींचा सन्मान होणे आणि समाजहिताचे महत्वपूर्ण पाईक म्हणून त्यांच्या कार्याला सातत्याने प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक असते. एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेचे आयोजन यंदाही केले असून यंदाचे हे दुसरे वर्ष असल्याची माहिती एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक व एनयुजे इंडियाचे उपाध्यक्ष शिवेद्रकुमार यांनी दिली.


एनयुजे महाराष्ट्रच्या सरचिटणीस सीमा भोईर यांनी ही स्पर्धा घोषित केली. राष्ट्रीय स्तरांवर आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत निवडलेल्या दर्जेदार छायाचित्रांचे प्रदर्शन जानेवारी 2019 ला मुंबईत आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनातच ‍विजेत्यांना पारितोषिके वितरीत केली जाणार आहेत.

 

या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार विजेत्याला रोख 15 हजार रुपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल. द्वितीय पुरस्कार विजेत्याला रोख 10 हजार रुपये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल.तृतीय पुरस्कार विजेत्याला रोख 7 हजार रुपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल.
 
या व्यक्तीरिक्त आणखी दोन लक्षणीय पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत.तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक छायाचित्रकारांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

 

सबंधित राष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेसाठी समिती गठित गेली असून, याचे प्रमुख संयोजक स्वप्निल पाटील असून त्यांच्यासह अनुभवी छायाचित्रपत्रकार या समितीत असल्याची माहिती एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली.


राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा 2018 चे अशी आहे नियमावली..

1)प्रवेश विनामूल्य

2)छायाचित्र स्पर्धेचा विषय:माझ्या नजरेतून भारत

3)पात्रता-फक्त वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून कायम व मुक्त स्वरुपात काम करणारे

4) नोंदणी- दि .१५ नोव्हेंबर  २०१८ ते ३० डिसेंबर २०१८

5) दिनांक ०१ जानेवारी २०१८ ते २५ डिसेंबर २०१८या कालावधीत वृत्तपत्रात छायाचित्रकाराच्या नावासहीत प्रसिद्ध झालेली छायाचित्रे असावीत.

6) छायाचित्रांसोबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राच्या वृत्तपत्राचे छायांकित कात्रण जोडावे.

7) प्रत्येकी 3 छायाचित्र वछायाचित्र आकार-8 इंच/12 इंच असावेत.

8) स्पर्धकांनी फोटो प्रिन्ट प्रत्यक्ष अथवा कुरीअर,पोस्टाने संबधित पत्त्यावर पाठवावीत.

9) 30 डिसेंबर 2018 नंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत.

10) स्पर्धेसाठी सहभागी केलेली छायाचित्रे परत दिली जाणार नाहीत, व वेळोवेळी इतर शहरांतील  छायाचित्र प्रदर्शनात त्यांचा उपयोग केला जाईल

 11) स्पर्धेसाठी गठीत केलेल्या समितीचे निर्णय व नियम अंतिम असतील.

 


प्रत्यक्ष किंवा कुरियरने छायाचित्रे पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे...

एनयुजे महाराष्ट्र कार्यालय- 12/60, खांडके बिल्डिंग, पहिला मजला, जे के सावंत मार्ग, शिवाजी मंदिरच्या समोर , दादर पश्चिम, मुंबई-28 फोन:022-24216101 (maharashtranuj@gmail.com)

 

अशी आहे स्पर्धा नियोजन समिती
- प्रमुख संयोजक स्वप्निल शिंदे 919821759447

- समन्वयक संदीप टक्के (मुंबई) 9869171319

- महेद्र जगताप (मुंबई) 9757412463

- जितेन गांधी (मुंबई) 9820238343,

- विजय गोहिल (मुंबई) 7738362835
- दिलीप कांगडा (मुंबई) 9322267466

- अमृत बिर्जे (बेळगाव) 9448393645

- वैशाली गलिम (पुणे) 9850674535

- उमा कदम (मुंबई) 9969126555

- किशोर निकम (औरंगाबाद) 9422202228

- प्रशांत खरोटे (नाशिक) 9960227222

 

बातम्या आणखी आहेत...