आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरच्या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार..जात प्रमाणपत्र अवैध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- नगरपालिकेमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आली आहे.

दोघांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. काँग्रेस मागील वर्षी झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा 'अ' मधून ओबीसी महिला पदासाठी काँग्रेसच्या उमदेवार सारिका मनोहर पाटील या निवडून आल्या होत्या. तर दुसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात 'अ' मध्ये ओबीसी पुरूष म्हणून दर्शन प्रताप पाटील हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

 

खोटे जातप्रमाणप‍त्र दाखवून लढवली निवडणूक
दोन्ही नगरसेवकांनी ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली होती. परंतु नगरसेविका सारिका पाटील यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवार नैन्सी राकेश मिस्त्री व नगरसेवक दर्शन प्रताप पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पराभूत उमेदवार अतुल तांबोळी यांनी खोटे जातप्रमाण पत्र दाखवून ओबीसी आरक्षणात निवडणूक लढवली असल्याने हरकत घेतली होती. त्यानुसार दोन्ही पराभूत उमेदवार यांनी दाद मागण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागात तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागाने सारिका पाटील व दर्शन पाटील यांच्या माळी इतर मागासवर्ग जातीय दावा अवैध ठरविण्यात आला. दोन्ही माळी व इतर मागास प्रवर्गात येत नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. या निकालानंतर दोन्ही उमेदवार व काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

भाजप व राष्ट्रवादीचा जल्लोष...

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागाचे आदेश प्राप्त झाल्याने भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर योग्य न्याय मिळाल्याने आतिशबाजी करून जल्लोष करण्यात आला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...