आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा साडी नेसलेला प्रतीकात्मक पुतळा जाळला; संदीप क्षीरसागर यांनी मारले कोल्हापुरी चपलेने फटके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- शिवसेनेच्या मुखपत्रातून दैनिक 'सामना'मधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अग्रलेखातून टीका करताना अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली होती. त्या अग्रलेखाचे पडसाद सोमवारी (दि.29) बीडमध्ये दिसून आले. राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यासह समर्थकांनी उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत नगर रोडवरील शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांचा साडी-चोळी घातलेला प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी पुतळ्याला कोल्हापुरी चप्पलचे फटके मारुन सदर लेखाचा निषेध केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणूण गेला होता.


शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात शनिवारी (दि.27) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. ही टीका करतांना वापरलेली भाषा प्रचंड हिन दर्जाची व पातळी सोडून केलेली होती. यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीकडून तसेच सुजान वाचकांकडून या अग्रलेखाचा निषेध नोंदवण्यात आला होता. या लेखाचा बीड जिल्ह्यातही सामना वर्तमान पत्राची होळी करुन निषेध नोंदवण्यात आला होता. परंतु सोमवारी (दि.29) सकाळी बीड जिल्हा शिवसेनेकडून अजित पवार यांचा शिवाजी चौकात पुतळा जाळण्यात आला. या घटनेने राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांनी जशास तसे उत्तर देत आक्रमक भुमिका घेतली. सकाळी आकरा वाजता शिवसेनेने केलेल्या कृतीला संदिप क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ‘इट का जवाब पत्थरसे’ म्हणत उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत कोल्हापुरी चपलांचे फटके मारत ठाकरे यांचा साडी घातलेला पुतळा जाळला. नगर रोडवरील शिवाजी चौकात दुपारी अडीच वाजता उद्धव ठाकरे यांच्या साडी घातलेल्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे मुर्दाबाद... अशा घोषणांनी परिसर दणाणूण गेला होता.

 

यावेळी राष्ट्रवादीचे युवानेते संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, भाऊसाहेब डावकर, दिलीप भोसले, नगरसेवक अमर नाईकवाडे, पं.स.सदस्य तथा गटनेते बळीराम गवते, पंकज बाहेगव्हाणकर, रमेश चव्हाण, नगरसेवक बाळासाहेब पोपळे, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, विशाल घाडगे, झुंजार धांडे, पं.स. सदस्य मोहन देवकते आदींची उपस्थिती होती.

 

पत्रकारितेची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही - संदीप क्षीरसागर

सामनातील ‘त्या’ अग्रलेखाचा दै. कार्यारंभने खरपूस समाचार घेतला. तुम्ही टीका करताना मर्यादा सोडून टीका करता, मग दुसर्‍या वर्तमानपत्राने तुमच्यावर योग्य पातळी राखून टीका केली तर स्थानिक शिवसेनेला इतक्या मिरच्या का झोंबल्या? आता तुमची दहशत खपवून घेतली जाणार नाही. तुम्हाला प्रत्येकवेळी विट का जवाब पत्थरसे असेच उत्तर मिळेल. त्यामुळे स्थानिक शिवसेनेने उगा कुणा मीडियाच्या कार्यालयावर चाल करुन जाऊ नये. येथील लोकशाहीचे संरक्षण करण्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समर्थ आहेत. तुमच्या विरोधात कोणी लिहूच नये असे समजत असाल तर पत्रकारांची लेखणी अजून धारदार होईल. कुणाही पत्रकाराला हात लावाल तर गाठ माझ्याशी असेल, असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी कार्यारंभच्या कार्यालयात येऊन दाबदडप करण्याचा प्रयत्न केला असता संदीप क्षीरसागर यांनी ताबडतोब कार्यारंभमध्ये जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना येथून निघा असे सुनावले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथून काढता पाय घेतला.

 

राष्ट्रवादीचा कार्यकर्ताच शिवसेनेला पुरुन उरेल....

शिवसेनेच्या काही माकडांनी ज्यांना कवडीची किंमत नाही आशनी अजित दादा पवार यांना बीडमध्ये आल्यास जिवंत जाळू अशी भाषा वापरली. त्यावर संदीप क्षीरसागर यांनीही खांडे यांच्या धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही. पवारांचे सोडा आधी आमच्यासमोर येण्याची हिंमत तरी तुमच्यात आहे का? आणि ऐवढीच जाळपोळीची खुमखुमी असेल तर लक्षात ठेवा, राष्ट्रवादीचा माझ्यासारखा एकटा कार्यकर्ताच तुमच्या संपूर्ण बीडच्या शिवसेनेला पुरे झाला, असे प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या वाघाच्या सध्या मांजरी झाली असल्याने बीडच्या शिवसेनेसह राज्यातल्या शिवसेनेला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच पुरुन उरतेल त्यामुळे शिवसेनेच्या नेते मंडळींना राज्यात फिरणं मुश्कील होईल असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी दिला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोठो...

 

बातम्या आणखी आहेत...