पवार म्हणतात..सरकारचे काळ्यापैशाचे / पवार म्हणतात..सरकारचे काळ्यापैशाचे धोरण फसले; गुंतवणूक करणार्‍या धनिकांना वाटतो स्विस बॅंकेचा आधार

प्रतिनिधी

Nov 09,2018 05:49:00 PM IST

बारामती- काळा पैसा लोकांच्या खात्यात जमा करण्यासाठी विरोधकांनी वारंवार संसदेत तगादा लावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्विर्त्झलंडचा दौरा केला. दौर्‍यात त्यांना स्वीस बॅंकेत जमा रक्कमेविषयी माहिती देण्याबाबत स्वीस सरकारने असमर्थता दर्शविली. त्यामुळे परदेशातील काळा पैसा भारतात आणून अर्थव्यवस्था सुधारण्याचे स्वप्न दिवा स्वप्न राहिले. अन्य देशातील भारतीयांच्या बक खात्यांची माहिती बाहेर आली. मात्र, सरकारचे काळ्या पैशाविषयीचे धोरण फसल्याने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नवीन नोटाबंदी धोरण राबवले, अशी टीका करत शरद पवारांनी स्वीस बँकेच्या गुप्ततेच्या वैशिष्ट्यांची बारामतीमधील धनिक व्यापार्‍यांसमोर उजळणी केली.

पवार म्हणाले की, जगात पैसा ठेवण्याची तीन-चार केंद्र आहेत. त्यापैकी स्वीस बँकेतील गुंतवणुकदाराची माहिती कधी बाहेर दिली जात नाही. स्वीस बॅंकेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदाराला स्वत: जावे लागते. काही नेमलेल्या कंपन्यांना गुंतवणुकदारांनी सूचना दिल्यावर बॅंकेतून रक्कम काढणे, रक्कम टाकणे, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणे. आदी कामे केली जातात. या सर्वकामासाठी गुंतवणुकदाराच्या स्वाक्षरीची गरज नसते. त्यामुळे गुंतवणूक करणार्‍याला आधार वाटतो. त्यामुळे स्वीस बॅंकेत पैसा ठेवण्याची प्रवृत्ती जगातील अनेक धनिकांमध्ये आहे. भारत देशातील गुंतवणूक मोठी नसली तरी स्वीस बॅंकेत गुंतवणूक आहे, अशी स्वीस बॅंकेची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेठली यांनी पहिल्यादा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. नंतर जेठलींनी नोटाबंदी हे कर संकलन वाढवणे, तसेच देशातील संपूर्ण पैसा विनिमयात आणण्याचा मुख्य उद्देश होता. असे नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर सांगितले. मात्र काळा पैसा सरकारला भारतात आणता न आल्याने नोटाबंदी करण्यात आली. हे खरे कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीकरांना सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काग्रेसचे नेते अजित पवार आदी मंडळी उपस्थित होती.

X
COMMENT