Home | Maharashtra | Pune | NCP Leader Ajit Pawar Attack on Shiv Sena and BJP in Baramati

मला भावी मुख्यमंत्री अथवा पवारसाहेबांना पंतप्रधान म्हणू नका..मित्रपक्षाकडून पाडापाडीचे राजकारण सुरु- अजित पवार

प्रतिनिधी | Update - Dec 17, 2018, 02:40 PM IST

काही नेतेमंडळींच्या डोळ्यात खुपतंच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जागा निवडून आल्यावर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करतील.

  • NCP Leader Ajit Pawar Attack on Shiv Sena and BJP in Baramati

    बारामती- आघाडी सरकारमधील अधिक आक्रमक बनून काँग्रेसशी काडीमोड घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने मागील विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवल्याने राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे वेळीच सावध झालेल्या अजित पवारांनी अतिमहत्वाकांक्षी न बनण्याचा सूचत इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या कार्यकर्त्यांना खुद्द अजित पवारांनी मला भावी मुख्यमंत्री म्हणून नका, अथवा पवारसाहेबांना भावी पंतप्रधान संबोधू नका.

    काही नेतेमंडळींच्या डोळ्यात खुपतंच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जागा निवडून आल्यावर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करतील, त्यातून मित्रपक्षाकडून पाडापाडीच राजकारण होते. आपले जमिनीवर पाय ठेवून पुढे गेलेलं बरं. पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच बहुमतात आणण्याचा प्रयत्न करू. भाजपा शिवसेना सत्तेतून बाहेर काढणे हे आपलं उद्दीष्ट आहे. असा जाहीर सल्ला बारामतीच्या एका खासगी कार्यक्रमात दिला. ते पणदरे (ता.बारामती) येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

    राज्यात बिकट परिस्थिती आहे. मात्र त्यावर थातूर-मातूर उत्तरे देऊन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी निवडणुका जवळ आल्यावर शिवसेना प्रभुरामचंद्र आठवते. तर भाजपला हनुमंतरायाची जात काढली जाते. पाच राज्यातील भाजपाचा पराभव भरून काढण्यासाठी आपण मोठी कर्जमाफी करत असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. हा केवळ निवडणुकीत मत मिळवण्यासाठी केलेला केवीलवाणा प्रयत्न आहेत. अशी जोरदार टीका अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर केली.

    शिवसेना सडली मग भाजपसोबत कशी
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षाना बरोबर भाजप- शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांचा पराभव हेच ध्येय समोर ठेवावे. शिवसेना-भाजपसोबत असताना विरोधीपक्षाची भूमिका घेतात. शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणतात, आमची पंचवीस वर्षे सडली. मग शिवसेना भाजपसोबत कशी काय युती करते. शिवसेना हे दुटप्पी राजकारण करत आहे.

Trending