आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संविधान बचाव\'च्या निमित्ताने राष्ट्रवादीत सॉफ्ट हिंदुत्त्वाचा चंचुप्रवेश..भाजप-संघाच्या अखंड भारत संकल्पनेचा घेतला आधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकत असून, औरंगाबादच्या संत तुकोबाराय नाट्यगृहात संविधान बचाव मेळाव्यात अखंड भारत, भारतमाता आणि संविधानाची सांगड घालण्याचा प्रयत्न एका नाटीका आणि चित्रफितीच्या माध्यमातून करण्यात आला. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्या तीन धर्मात सलोखा राखण्यासंबंधीची नाटिका सादर केली गेली तर चित्रफितीमध्येही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखंड भारत संकल्पनेवर जास्तीत जास्त जोर देण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकत असल्याचे जाणकारांचे मत आहे. संविधान बचावच्या निमित्ताने राष्ट्रवादीत सॉफ्ट हिंदुत्वाचा चंचुप्रवेश होत आहे.

 

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर घेतले तोंडसुख...

शेतकऱ्यांना तूर, हरभऱ्याचे पैसे मिळत नाही आणि फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने काय बघता, असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी मुख्यमत्र्यांवर तोंडसुख घेतले. दुष्काळाच्या मुद्यावरुनही त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

 

देशातील सरकार श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगोरिबांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. चोक्सी, नीरव मोदी यांनी कित्येक कोटी घेऊन पळून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे दिसत नाही. नोटबंदीमुळे देशोधडीला लागलो. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. मात्र, यांना शेतकरी आणि गरीबांचे देणेघेणे नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

 

चित्रफितमध्ये प्रथमच राम आणि सीतेचा मोठा फोटो
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अद्यक्षा फौजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बचाव मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. सतीश चव्हाण, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे यांच्यासह मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नाटीका व चित्रफित दाखविण्यात आली.

 

चित्रफितमध्ये प्रथमच राम आणि सीतेचा मोठा फोटो दाखविण्यात आला. तसेच बनारस येथील घाटाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. अखंड भारताचा फोटो आणि फाळणीची घटना विषय करण्यात आली. स्वातंत्र्यासंबधीची माहितीही चित्रफितीमध्ये सादर करण्यात आली. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा फोटो आणि जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा या गाण्याचाही आधार घेण्यात आला. नाटिकेत भारतमाता आणि संविधान यामधील संवाद सादर करण्यात आला. भारतमाता संविधानाला माझे अस्तित्व तुझ्यामुळे कसे आबाधित राहिले हे सांगते. मी केवळ संविधामुळेच अखंड राहू शकते असा संदेश त्याद्वारे देण्यात आला आहे. चित्रफितीमध्ये फौजिया खान यांनी तयार केलेली डाक्युमेंटरी सादर करण्यात आली. यामध्ये स्वामी अग्निवेश यांना झालेली मारहाण, नोटबंदी, स्व. इंदिरा गांधी यांची आणीबाणी घोषित तर आज मोदीद्वारे अघोषित आणिबाणी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. नाटीकेत शिख्ख धर्माचा उल्लेख नसला तरी चित्रफितीमध्ये मात्र सुवर्ण मंदिराचा उल्लेख घेतला आहे.

 

अजितदादा, सुप्रियाताईंनी घेतला इम्रतीचा आस्वाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘संविधान बचाव’ मेळाव्यासाठी औरंगाबादेत आलेले अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या बहिण-भावांनी मंगळवारी स्थानिक आमदार सतीश चव्हाण यांच्यासह शहरातील प्रसिद्ध उत्तम मिठाई भांडार येथे जाऊन स्वादिष्ट इम्रती, भजांचा आस्वाद घेतला. तसेच गुलमंडी भागात फेरफटका मारुन फळे, पुस्तकांची खरेदीही केली.

 

बातम्या आणखी आहेत...