आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर..? मुख्यमंत्र्यांसह या भाजप मंत्र्यांची मुंबईत घेतली भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांही उपस्थित होत्या. या भेटीवरून उदयराजे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

 

राष्‍ट्रवादीकडून भोसले यांनी उमेदवारी मिळणार नसल्याने उदयराजे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही भेट विकासकामांसाठी असल्याचे स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

 

उदयनराजे यांनी सांगितले की, मतदारसंघातील कामांबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  मात्र, या भेटीमागे राजकीय गणित असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

या भाजप नेत्यांची घेतली भेट..

उदयनराजे यांनी केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांचीच नाही तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे उदयनराजे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी तब्बल अर्धा तास प्रतिक्षा केली. यांची भेट घेण्यासाठी गेले.

बातम्या आणखी आहेत...