आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट..राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु आव्हाड उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याने राजकीय चर्चा थंड पडल्या.

 

एखाद्या पक्षाच्या नेत्याने वैयक्तिक कामासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची भेट घेतली की लगेचच त्यातून राजकीय अर्थ काढले जातात, असे सांगत आपण वैयक्तिक कामासाठी ठाकरेंची भेट घेतल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.  

 

शुक्रवारीच मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली. या बैठकीच्या आधी शरद पवार यांच्याशी चांगले सख्य असलेले जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने चर्चा सुरू झाली. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे म्हटले जात होते. परंतु आव्हाड त्यांच्या ऑ'क्टोबरला होणाऱ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे स्पष्ट झाले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित राहणार असून ठाकरे यांनीही यावे, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचे समजते. ठाकरे या कार्यक्रमाला जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.   
 
मी इतका मोठा नेता नाही  
'मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. प्रत्येक भेटीचा अर्थ हा राजकीयच नसतो. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती, महाआघाडी अशी राजकीय चर्चा करण्याइतका मी मोठा नेता नाही.'   
- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी नेते

बातम्या आणखी आहेत...