आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेधनाच्या दुसर्या दिवशी सभागृहात झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पत्र लिहिले आहे. विधिमंडळातील राजदंड मला मतदारसंघात घेऊन जाऊ द्या, राजदंड उचलून जर प्रथा-परंपरा तुडवण्यात येत असतील आणि राजदंड शोभेची वस्तू म्हणून राहणार असेल, तर तो मला मतदारसंघात घेऊन जाऊ द्यावा' अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी पत्रातून केली.
मराठा आरक्षणापाठोपाठ मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवरून हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर जाऊन कागदपत्रे फाडून भिरकावली. एवढेच नाही तर राजदंड उचलला. तरीही सभागृह तहकूब झाले नाही. राजदंड उचलल्यावरही कामकाज सुरु होते', असे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सभागृहात अध्यक्ष असतात तेव्हा राजदंड असतो, ते जातात तेव्हा राजदंड जातो. ते प्रातिनिधिक सन्मानचिन्ह असते. राजदंड उचलला जातो तेव्हा सभागृह तहकूब व्हायला हवे. मात्र, राजदंड उचलल्यावरही कामकाज सुरु होते' असे निरीक्षणही आव्हाड यांनी आपल्या पत्रांत नोंदविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.