Home | Maharashtra | Mumbai | NCP Women Party Workers terms Ram Kadam As Ravan Kadam For His Anti Women Statement

भाजपचे राम कदम नव्हे ‘रावण’ कदम; राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केले नामकरण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 06:59 PM IST

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांचे ‘रावण’ कदम असे नामकरण केले आहेत.

  • NCP Women Party Workers terms Ram Kadam As Ravan Kadam For His Anti Women Statement

    मुंबई- भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात मुंबईसह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन केले. राम कदम यांच्या महिलांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांचे ‘रावण’ कदम असे नामकरण केले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचे फटके मारले. बांगड्यांचा आहेर दिला.

    दुसरीकडे, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांचा महिलांसंदर्भात वक्तव्याचा निषेध केला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विदया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींच्यावतीने भाजप आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देत आणि त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

Trending