आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जनादरम्यान 2 सख्ख्या भावांसह 4 जणांचा बुडून मृत्यू, निष्काळजीपणाने हिसकावून घेतला 3 घरांमधील आनंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर (मप्र)- गणपती विसर्जनादरम्यान पाण्याने भरलेल्या 10 फूट खोल खड्ड्यात बुडून दोन सख्ख्या भावांसह चार मुलांचा मृत्यू झाला. काल, गुरुवारी सायंकाळी महाराजपुरा येथील एमिटी यूनिव्हर्सिटीमागे ही हृदयद्रावक घटना घडली. मृत मुले एकाच गावातील होते.

 

थोरल्या भावाने रोखले, तरीही धाकडे भाऊ पाण्यात उतरले...

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी सात मुले पाण्यात उतरले होते.  त्यापैकी चौघांचा बुडून मृत्यू झाला. मुले पाण्यात जात असताना थोरल्या भावाने त्यांना रोखले. परंतु ते थांबले नाहीत, पुढे निघून गेले. धाकट्या भावांना पाण्यात बुडताना पाहून थोरल्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

 

सतीश शिशुपाल बघेल (13), अजय कल्याण बघेल (14), सूरज शिशुपाल बघेल(18), शिवम दयाराम गौर (16) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सतीश आणि सूरज हे दोघे सख्‍खे भाऊ होते तर अजय हा त्यांच्या चुलत भाऊ होता.

 

निष्काळजीपणाने हिसकावून घेतला 3 घरांमधील आनंद...
मुलांच्या न‍िष्काळजीपणाने तीन कुटुंबातील आनंद हिसकावून घेतला. अजय बघेलची आई मागील काही महिन्यांपासून आजारी आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिची शुद्ध हरपली. 'मला माझ्या मुलाचा चेहरा दाखवा..', एवढेच ती बडबडत होती.

 

सूरजचा खूप आवडता होता सतीश, मृत्यूनंतरही सोडला नाही त्याचा हात...

सूरज आणि सतीश हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. आईने मोठ्या परिश्रमातून सूरज, सतीश आणि अरुणचे पालनपोषण केले होते. मागील दोन वर्षांपासून सूरजने संपूर्ण घराची जबाबदारी स्विकारली होती. सूरज मजदूरी करत होता. परंतु धाकट्या भावांना मोठे  अधिकारी बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. भाऊ पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी त्याने उडी घेतली. मृत्यूनंतरही त्याने सतीशचा हात सोडला नाही.

बातम्या आणखी आहेत...